नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगानं आज निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमध्ये दोन टप्प्यांत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. १ आणि ५ डिसेंबर रोजी दोन टप्प्यांत गुजरात विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे. तर हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीबरोबरच गुजरात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी ८ डिसेंबर रोजी होणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन गुजरात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. गुजरातमध्ये यंदा ३ लाख २४ हजार नवे मतदार आहेत. तसेच राज्यात एकूण ५१ हजार ७८२ मतदान केंद्र सज्ज असणार आहेत. यासाठी कडेकोड सुरक्षा व्यवस्था देखील असणार आहे. सर्व मतदान केंद्रांवर सर्व सुविधा असतील. पिण्याचे पाणी, वेटिंग रुम, टॉयलेट, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सुविधा यांचा समावेश असणार आहे. तसेच राज्यातील ५० टक्के मतदान केंद्रांवर मतदानाचे लाइव्ह टेलिकास्ट देखील होणार आहे.
निवडणूक आयोगाकडून यावेळी सोशल मीडिया टीम देखील नियुक्त करण्यात येणार आहेत. ज्या फेक न्यूजवर लक्ष ठेवणार आहेत. फेक न्यूजचा प्रसार करणाऱ्यांवर तातडीनं जी काही कठोर कारवाई असेल ती केली जाणार असल्याचं राजीव कुमार यांनी सांगितलं. तसंच फेक न्यूज फॉरवर्ड करू नका आवाहन देखील यावेळी राजीव कुमार यांनी मतदारांना केलं आहे.
असा आहे गुजरातचा निवडणूक कार्यक्रम
पहिला टप्पा
निवडणुकीसाठीचे नोटिफिकेशन- ५ नोव्हेंबर २०२२
अर्ज दाखल करण्याची मुदत- १४ नोव्हेंबर २०२२
अर्ज छाननी प्रक्रिया- १५ नोव्हेंबर २०२२
उमेदवारी माघार घेण्याची मुदत- १७ नोव्हेंबर २०२२
मतदानाची तारीख- १ डिसेंबर २०२२
दुसरा टप्पा
निवडणुकीसाठीचे नोटिफिकेशन- १० नोव्हेंबर २०२२
अर्ज दाखल करण्याची मुदत- १७ नोव्हेंबर २०२२
अर्ज छाननी प्रक्रिया- १८ नोव्हेंबर २०२२
उमेदवारी माघार घेण्याची मुदत- २१ नोव्हेंबर २०२२
मतदानाची तारीख- ५ डिसेंबर २०२२
मतमोजणी- ८ डिसेंबर २०२२
माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…
वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…
भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…