मुंबई : आता व्हॉट्सॲपनेही त्यांच्या Whatsapp Features मध्ये twitter फिचर्सचा समावेश करून घेतला आहे. एडिट फिचरच्या माध्यमातून तुम्ही कोणाला चुकीचा मॅसेज केला असल्यास तो करेक्ट करण्याचा पर्याय तुम्हाला उपलब्ध झाला आहे.
यामध्ये कंपनी एडिट मेसेजसोबत एक एडिट लेबलही आणेल. जो रिसीव्हरला मेसेज एडिट झाल्याचे सांगेल. हे वैशिष्ट्य ट्विटरने अलीकडेच लाँच केलेल्या Edit बटणासारखे असेल.
रिपोर्टनुसार Whatsapp एडिटिंग मॅसेजेच आणत आहेत. या फिचरच्या मदतीने यूजर्स पाठवलेला मेसेज एडिट करू शकतील. एवढेच नव्हे तर युजर्सला एडिटेड मेसेजसोबत एडिटेड लेबलही दिसेल. हे फिचर ट्विटरने अलीकडेच विकसित केलेल्या एडिट फिचरसारखे असेल.
तुम्ही मॅसेज सेंड केल्यानंतर तुम्हाला १५ मिनिटापर्यंत मॅसेज एडिट करता येणार आहे. मॅसेज वाचून एडिट करता येईल की नाही यासंदर्भात अजूनही व्हॉट्सॲपने अधिकृत माहिती दिलेली नाही.