मुंबई : संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. मात्र, कोर्टाने सुनावणी पुढे ढकलली. आता ९ नोव्हेंबरला त्यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी होणार आहे. यामुळे त्यांना आणखी काही दिवस कोठडीत रहावे लागणार आहे.
राऊतांच्या जामीनासंदर्भात ईडीने आज लेखी उत्तर सादर केले. जामीनावरील निकाल न्यायालयाने राखून ठेवला आहे.
संजय राऊतांना कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने अटक केली होती. विशेष म्हणजे प्रविण राऊत आणि संजय राऊत यांच्या जामीनावर एकाच दिवशी ९ नोव्हेंबरला कोर्ट निर्णय देणार आहे. आजच्या सुनावणीवेळी त्यांचे कुटूंबदेखील कोर्टात हजर होते.