भुयारी मेट्रो-३ च्या स्थानकांवर लहान बाळांसाठी सुविधा

  85

मुंबई (वार्ताहर) : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३चे काम सध्या वेगाने सुरू असून या स्थानकांवर प्रवाशांकरिता विविध सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. लहान मुलांच्या स्वच्छतेचा विचार करता मेट्रो-३च्या २६ स्थानकांवरील प्रसाधनगृहात बाळाचे डायपर बदलण्यासाठी खास व्यवस्था करण्यात येणार आहे.


लोकलवरील ताण कमी करण्यासह प्रवाशांना जलद, सोयीचा प्रवास करता यावा याकरिता कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३ सोयीस्कर ठरणार आहे. या भुयारी मेट्रो-३च्या २६ स्थानकांवर उभारण्यात येणाऱ्या महिला व पुरुष प्रसाधनगृहात बाळाचे डायपर बदलण्याची सुविधा असणार आहे. या प्रकारची सेवा सुविधा देणारे मेट्रो-३ हे देशातील पहिलेच कॉर्पोरेशन असेल, असा दावाही या सुविधेच्या निमित्ताने करण्यात आला आहे.


यासंदर्भात मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाचे प्रवक्ते यांनी सांगितले की, "मुंबई मेट्रो-३ मध्ये प्रथमच स्थानकातील पुरुषांच्या स्वच्छतागृहात लहान मुलांचे डायपर बदलण्याची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. आतापर्यंत भारतातील कोणत्याही मेट्रो स्थानकावर मुलांच्या डायपर चेजिंगची सुविधा पुरुषांच्या स्वच्छतागृहात नाही. मात्र आपण तो प्रयत्न सुरू करणार आहोत, असे सांगण्यात आले.

Comments
Add Comment

राज्यात २४ तास वाळू वाहतुकीला परवानगी

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यात वाळू वाहतुकीसंदर्भातील दीर्घकाळ प्रलंबित असलेला

२५ जुलैपासून रेल्वेची रामायण यात्रा पर्यटन ट्रेन सुरू

मुंबई : भगवान रामाशी संबंधित धार्मिक स्थळांना भेट देऊ इच्छिणाऱ्या यात्रेकरूंसाठी इंडियन रेल्वे केटरिंग अँड

Chandrashekhar Bawankule : भूमी गैरव्यवहार प्रकरणी उपविभागीय अधिकाऱ्याचे निलंबन! महसूल मंत्री बावनकुळेंची विधानसभेत घोषणा

आठ मुद्रांक अधिकाऱ्यांवरही कारवाईचे संकेत मुंबई : नाशिक जिल्ह्यातील संगमेश्वर येथील भूमाफियांनी केलेल्या

राज्यात कुपोषित बालकांची आकडेवारी चिंताजनक

मुंबईत सर्वाधिक, तर पुण्यात संख्येत घट मुंबई : कधीकाळी कुपोषित बालकांचा जिल्हा अमरावती जिल्ह्यातील मेळघाट हा

सौर पंप शक्य नसल्यास पारंपरिक कृषी पंप देणार

भौगोलिक परिस्थितीनुसार निर्णय घेणार मुंबई : राज्य शासनाने सौर ऊर्जेवर आधारित कृषी पंप देण्यावर भर दिला आहे.

वाहतूकदारांच्या संपात ७० हजार वाहने सहभागी

नागरिकांसह आयात-निर्यातदारांना संपाचा मोठा फटका मुंबई : ई-चलन व वाहतूकदारावर लाभलेल्या इतर अनेक अन्यायकारक