Tuesday, December 3, 2024
Homeमहामुंबईकॅगच्या चौकशीमुळे अधिकाऱ्यांसह नगरसेवकही अडचणीत?

कॅगच्या चौकशीमुळे अधिकाऱ्यांसह नगरसेवकही अडचणीत?

दोन्ही खर्चाची होणार चौकशी

मुंबई (प्रतिनिधी) : कोविड काळात झालेल्या कामांच्या भ्रष्टाचारबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कॅग चौकशीचे आदेश दिले आहेत. या चौकशीमुळे अधिकारी वर्ग अडचणीत येऊ शकतो अशी चर्चा असतानाच आता नगरसेवकही अडचणीत येण्याची शक्यता आहे.

कोविड काळातील उपाययोजना आणि खरेदीचे अधिकार स्थायी समितीने अधिकाऱ्यांना दिले होते. यामुळे कोविड काळातील खरेदीत प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मात्र कोरोना काळात नगरसेवकांना आपल्या निधीतून १५ लाख रुपये खर्च करण्याची मुभा देण्यात आली होती. त्यानुसार आधी १० लाख आणि नंतर ५ लाख अशी मंजुरी देण्यात आली होती. हे पैसे नगरसेवक निधींतून खर्च केले आहेत. नगरसेवकांच्या या खर्चाची देखील तपासणी होणार आहे. त्यामुळे नगरसेवकही अडचणीत येण्याची शक्यता आहे.

दरम्यान कोरोना काळात अनेक नगरसेवकांनी आपल्या स्वखर्चाने मास्क, जंतुनाशक, औषध फवारणी मशीन खरेदी केले होते, यामुळे पालिकेने नगरसेवकाना निधी वापरण्याची परावनगी द्यावी अशी मागणी होत होती. त्यानंतर पालिका प्रशासनाने नगरसेवकांना आपल्या विभागातील नागरिक लाभ देता येईल असे सांगितले. त्यानंतर आपल्या प्रभागातील अत्यावश्यक सेवेतील नागरिकांना स्वसंरक्षणार्थ पीपीई किट तसेच नागरिकांना एन-९५ मास्क, कॉटन फेस्क मास्क, सॅनिटायझर अशा साहित्य खरेदी करण्याचा समावेश करण्यात आला. यामुळे आता होणाऱ्या चौकशीत केवळ अधिकारीच नाही तर नगरसेविकाच्या खर्चाची देखील चौकशी होणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -