ज्ञान हाच देव असे आम्ही जे म्हणतो त्याचे कारण हे की जे काही ज्ञान आहे. ते सर्व दिव्यच आहे. या दिव्य ज्ञानाच्या ठिकाणी दिव्य शक्ती आहे. या दिव्य ज्ञानाच्या ठिकाणी दिव्य आनंद आहे. हा आनंद ज्या ठिकाणी असतो तो त्या ठिकाणी कधीही उगा राहात नाही. तेंडुलकरने सिक्सर मारली तर आपण आनंदाने टाळ्या पिटतो. आपला मुलगा मॅट्रिकला पहिला आला तर माणूस आनंदाने नाचतो. सगळ्यांना पेढे वाटतो. पार्टी देतो कारण हा आनंदात असतो. हा आनंद होतो कधी तर तो आनंद असतो म्हणून. “नासते विद्यते भावो न भावो विद्यती” असे म्हटलेले आहे. जे असते ते दिसते. जे नसते ते दिसणार नाही. जे मुळांतच नाही ते दिसणार कसे व जे नसतानाही दिसते असे वाटते तो आभास असतो. सांगायचा मुद्दा असा इंद्रधनुष्य आपल्याला दिसते पण तो आभास असतो. जे असते ते दिसते.
आनंद असतो म्हणून तो जेव्हा स्फुरतो तेव्हा तो आपल्याला प्रत्यक्षपणे दिसत नाही. पण ज्याला आनंद झाला त्याच्या चेहऱ्यावर तो दिसतो. आनंद कुणालाच दिसत नाही पण याला आनंद झाला हे त्याच्या बॉडी लँग्वेजवरून त्याच्या चेहऱ्यावरून दिसते. आनंद हा डायरेक्टली दिसत नाही. कारण आनंद हा निर्गुण आहे. तोच आनंद हे देवाचे दिव्य स्वरूप आहे. हा आनंद जेव्हा स्फुरला तेव्हा जगातल्या ज्या अनेक गोष्टी निर्माण झाल्या. त्या त्याच्या पोटातून निर्माण झाल्या. अनंतकोटी ब्रह्मांडे ज्याच्या उदरी असे जे म्हटलेले आहे ते अगदी बरोबर आहे. “मीची मज व्यालो आपुलेची पोटा आलो” असेही तुकाराम महाराजांनी म्हटलेले आहे. अनंतकोटी ब्रह्मांडे म्हणजे आपल्याला जो सूर्य दिसतो असे अनेक सूर्य आहेत. आपल्याला जे ग्रह दिसतात असे अनेक ग्रह आहेत. हे ग्रह कधी कोसळत नाहीत किंवा कधी एकमेकांवर आपटत नाहीत. हे सर्व ग्रह व्यवस्थित सूर्याभोवती फिरतात म्हणून आपल्याला दिवस-रात्र आहेत. हे काही आजच चाललेले आहे असे नव्हे तर हे अनेक युगे चाललेलेच आहे. जो सूर्य त्रेतायुगांत होता, सत्ययुगांत होता तोच सूर्य आज आहे.
तोच चंद्र आज आहे. तोच समुद्र आज आहे. त्यावेळी जे निसर्गनियम होते तेच आज आहेत. प्रभू रामचंद्राच्या वेळी जे निसर्गाचे नियम होते तेच आजही आहेत. कलियुगांत निसर्गाचे नियम वेगळे आणि पूर्वी निसर्गाचे नियम वेगळे असे काही नाही. हे सगळे जर बघितले तर किती योजना आहे, किती व्यवस्था आहे हे ध्यानात येईल. तुम्ही कुठल्याही झाडाकडे बघितले तर तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्था दिसेल. माणसांकडे प्राण्यांकडे कुठल्याही जलचराकडे बघा तुम्हाला व्यवस्था दिसेल. ही व्यवस्था आपोआप होते का? गणपतीची एक मूर्ती बनवायची असेल तर किती खटाटोप करावा लागतो. माणसांच्या मात्र एवढ्या मूर्त्या तयार झालेल्या आहेत. अगदी हातही न लावता. अनंत प्रकारचे प्राणी, अनंत प्रकारचे पक्षी पुन्हा त्यात एक दुसऱ्यासारखा नाही. हे सगळे काय आपोआप होते? हे आपोआप होते म्हणण्याला काही अर्थ नाही. या सर्वाला कारणीभूत आनंदस्वरूप अनंतकोटी ब्रह्मांडनायक परमेश्वर.
– सद्गुरू वामनराव पै
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…
महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…
- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…
- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…