Monday, June 16, 2025

सैन्य दलातील अधिकारी महिलेला शेतकरी असल्याचा अभिमान

सैन्य दलातील अधिकारी महिलेला शेतकरी असल्याचा अभिमान

कुडाळ : बांव गावातील मुलीने सैन्य दलातील लेफ्टनंट पदापर्यंत मजल मारल्याने येथील ग्रामस्थांनी लेफ्टनंट दिपाली गावकर हिचे मिरवणूक काढून जल्लोषात स्वागत केले.


एका शेतकरी कुटुंबातील सैन्य दलातील अधिकारी पदापर्यंत मजल मारणारी कुडाळ तालुक्यातील बांव गावातील लेफ्टनंट दिपाली गावकर ही गावी आली आहे. तिच्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन आणि कौतुक होत आहे. बांव गावातील ग्रामस्थांनी लेफ्टनंट दिपाली गावकर हिची स्वागत रॅली काढली.


लहान असल्यापासून शेतीमध्ये काम करण्याची आणि शेतीत राबण्याची सवय होती. शेतीत काम केल्याचा फायदा मला सैनिकी प्रशिक्षणामध्ये झाला आणि मला तो अभिमान आहे. जेव्हा मी प्रशिक्षणामध्ये कुशलपणे एखादी कृती करायची तेव्हा प्रशिक्षण देणारे अधिकारी, माझे सहकारी सुद्धा माझे कौतुक करत असत. त्यावेळी मला अभिमान आहे मी शेतकऱ्याची मुलगी असल्याचा असे मी सांगायचे, असे सैन्य दलातील लेफ्टनंट दिपाली गावकर यांनी सांगितले.


माझ्या आई-वडिलांनी मला नेहमीच पाठिंबा दिला. त्यामुळे मी सैन्य दलात जाऊ शकले. सैन्य दलामध्ये हरियाणा, पंजाब या भागातील मुली मोठ्या प्रमाणावर असतात. महाराष्ट्रीयन मुली त्यामानाने खूप कमी असतात, असे सांगून माझे ध्येय निश्चित होते त्याच्यात यश येवो की अपयश येवो तरी प्रयत्न करत राहणे हे मी ठरविले होते, असेही लेफ्टनंट दिपाली गावकर यांनी सांगितले. लेफ्टनंट दिपाली गावकर यांनी सैन्याचे प्रशिक्षण चेन्नई येथे घेतले तर सध्या मणिपूरला कार्यरत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >