Thursday, January 15, 2026

सलमान खानला वाय प्लस दर्जाची सुरक्षा

सलमान खानला वाय प्लस दर्जाची सुरक्षा

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसापूर्वी लॉरेन्स बिश्नोई टोळीने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. यानंतर सलमानला वाय प्लस दर्जाची सुरक्षा दिली आहे.

सलमानला आलेल्या धमक्या लक्षात घेऊन राज्य सरकारने हा निर्णय घेतला असल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांनी दिली. अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील लेखक सलीम खान यांना काही दिवसापूर्वी धमकीचे पत्र मिळाले होते. या पत्राचा संबंध गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोईशी असल्याचे आढळले होते. पत्राची सत्यता पडताळणीसाठी दिल्ली पोलिसांनी सलमानला दिलेल्या धमकी पत्राबद्दल तिहार कारागृहात बंद असलेल्या बिश्नोईकडे चौकशी केली.

Comments
Add Comment