वाडा (वार्ताहर) : पालघर-वाडा-देवगांव या राज्यमार्गावर ओगदा गावाजवळ रस्त्याला भगदाड पडले आहे; मात्र या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने पर्यायी रस्ता सुरू करून दिला आहे. मात्र या नादुरुस्त रस्त्याचे कारण पुढे करत पालघर व वाडा एसटी आगार व्यवस्थापनाने या मार्गावरील बस फेऱ्या महिनाभरापासून बंद केलेल्या आहेत. त्यामुळे रुग्ण, व्यापारी, चाकरमान्यांसह प्रवाशांचे हाल होत आहे.
वाडा- खोडाळा मार्गावर ओगदा गावाजवळ रस्त्याला भगदाड पडले आहे. वाहतूक सुरळीत राहण्यासाठी या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने पर्यायी रस्ता सुरू केला आहे. या मार्गावरून सर्व वाहनांची वाहतूक सुरळीत सुरू आहे. या राज्यमार्गावर पालघर व वाडा आगाराच्या औरंगाबाद, नंदुरबार, अक्कलकुवा, शिर्डी व मोरचोंडी या लांब पल्ल्याच्या बससेवा आहेत. मात्र, कोणतीही पूर्वसूचना न देता या बससेवा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अतिदुर्गम भागातून बाजारपेठेत येणारे नागरिक, रुग्ण, व्यापारी आणि चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. या सर्व प्रवाशांना बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्यांतून जादा भाडे देऊन प्रवास करावा लागत आहे.
पालघर-वाडा-देवगांव हा राज्यमार्ग मुंबई-आग्रा आणि मुंबई-अहमदाबाद या दोन राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा मार्ग आहे. या मार्गावरून पालघरला जिल्ह्याच्या ठिकाणी न्यायालयीन तसेच अन्य कामांसाठी जाणे सोयीचे आहे. तसेच त्र्यंबकेश्वर, नाशिक, वणी आणि शनिशिंगणापूर या तीर्थक्षेत्रांकडे जाणारा जवळचा मार्ग आहे. त्यामुळे या मार्गावरून वाहनांची सतत वर्दळ असते. गेल्या वर्षी याच मार्गावर मोरी खचल्याने दोन महिने बससेवा बंद होती.
आंदोलनाचा इशारा
पर्यायी मार्गाने वाहतून सुरळीत सुरू आहे. त्यामुळे तातडीने बससेवा सुरू कराव्यात; अन्यथा आंदोलन करावे लागेल, असा इशारा प्रवासी हितवर्धक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब मुळे यांनी दिला आहे.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…