
मोरबी : गुजरातमधील पूल दुर्घटनेनंतर आज तिसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी मोरबीला पोहोचले. येथे त्यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जखमींची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यानंतर त्यांनी एसपी कार्यालयात आपल्या प्रियजनांना गमावलेल्या २६ कुटुंबांचीही भेट घेतली. त्यांनी येथील अधिकाऱ्यांची बैठकही घेतली. मोरबी येथे येताच पंतप्रधानांनी प्रथम घटनास्थळी जाऊन तुटलेल्या पुलाची पाहणी केली.
गुजरातचे गृह राज्यमंत्री हर्ष संघवी यांनी त्यांना या घटनेची माहिती दिली. ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळपर्यंत झालेल्या मोरबी येथील पूल दुर्घटनेत आतापर्यंत १३५ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अपघाताच्या तिसऱ्या दिवशी मंगळवारी नौदल आणि एनडीआरएफच्या पथकांनी मृतदेहांचा शोध सुरू केला आहे.
दरम्यान, गुजरातमध्ये बुधवारी एक दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.