Tuesday, April 29, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीराजकीय

रवी राणा, बच्चू कडू यांनी मागितली एकमेकांची जाहीर माफी

रवी राणा, बच्चू कडू यांनी मागितली एकमेकांची जाहीर माफी

मुंबई : मागच्या काही दिवसांपासून आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात टोकाचा वाद सुरु होता. त्यावर आता पडदा पडला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत रवी राणा यांनी सुमारे अर्धा तास चर्चा केली. त्यानंतर रवी राणा यांनी बच्चू कडू यांची जाहीर माफी मागितली. त्यानंतर बच्चू कडू यांनीही त्यांचे शब्द माघारी घेतले आहेत.

यामुळे राणा आणि कडू यांच्या वादावर पडदा पडला आहे. गेल्या आठवडाभरापासून या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या होत्या. त्यामुळे अनेकांचे लक्ष याकडे वेधले गेले होते.

कडु म्हणाले, मी आता माझ्या कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेणार आहे. राणा यांनी माफी मागितल्याचे मला कळले आहे. त्यामुळे देखील यापुढे वाद नको म्हणून माघार घेतो आहे. माझे शब्द मागे घेतो. यापुढे सामाजिक कामाला प्राधान्य देणार असल्याचे कडू यांनी सांगितले. तसेच उद्या कार्यकर्ते एकत्र भेटणार आहेत त्यावेळी पुढील धोरण काय असेल ते जाहीर करु असे त्यांनी सांगितले.

आमदार बच्चू कडू आणि अपक्ष आमदार रवी राणा यांच्यातील वाद मिटविण्यासाठी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच पुढाकार घेतला होता.

Comments
Add Comment