Saturday, May 10, 2025

विदेशमहत्वाची बातमी

कोहलीच्या रुममधील व्हीडिओ व्हायरल करणाऱ्यावर कारवाई

कोहलीच्या रुममधील व्हीडिओ व्हायरल करणाऱ्यावर कारवाई

पर्थ (वृत्तसंस्था) : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेदरम्यान रुममधील व्हायरल झालेल्या व्हीडिओबाबत भारतीय संघाचा फलंदाज विराट कोहलीने नाराजी व्यक्त केली आहे. हा व्हीडिओ त्याच्या पर्थमधील हॉटेल रुमचा आहे. त्यावेळी हॉटेलमधील कोहलीच्या खोलीत एक अज्ञात व्यक्ती घुसला आणि कोहली खोलीत नसतानाचा व्हीडिओ बनवला. हा व्हीडिओही व्हायरल झाला होता. आता हॉटेलने याबाबत आपले वक्तव्य जारी केले असून माफी मागितली आहे.


या प्रकाराबद्दल स्पष्टीकरण देताना हॉटेलने सांगितले आहे की, त्यांनी या प्रकरणी तत्काळ कारवाई केली असून यामध्ये सहभागी असलेल्या व्यक्तीला हॉटेलमधून काढून टाकण्यात आले आहे. क्राउन पर्थ नावाच्या हॉटेलने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, आम्ही या प्रकरणात सहभागी असलेल्या आमच्या पाहुण्यांची माफी मागतो. या प्रकरणात क्राऊनने तातडीने पावले उचलली आहेत. यामध्ये ज्या व्यक्तीचा सहभाग होता त्याला काढून टाकण्यात आले असून त्याला काऊंटच्या अकाउंटमधूनही काढून टाकण्यात आले आहे. मूळ व्हीडिओ सोशल मीडियावरूनही हटवला जाईल.


हॉटेलने सांगितले की, या प्रकरणाची थर्ड पार्टीकडून चौकशी केली जात आहे. निवेदनात असे लिहिले आहे की, क्राऊन या प्रकरणाची तृतीय पक्षामार्फत चौकशी करत आहे. त्याचबरोबर असा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. आम्ही भारतीय क्रिकेट संघ आणि आयसीसीची माफी मागतो.


हा व्हीडिओ समोर आल्यानंतर कोहलीने इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहून आपला राग व्यक्त केला होता. कोहलीने आपल्या पोस्टमध्ये लिहिले होते की, मला वाटते की चाहते त्यांच्या आवडत्या खेळाडूंना पाहून खूप आनंदित होतात, त्यांना भेटतात आणि मी त्याचे कौतुक करतो. पण या व्हीडिओने माझ्या प्रायव्हसी बद्दल चिंता वाढवली आहे. जर मला माझ्या हॉटेलच्या खोलीत प्रायव्हसी मिळत नसेल, तर मी माझ्या पर्सनल स्पेसची अपेक्षा कुठे करावी?

Comments
Add Comment