नवी दिल्ली : कोरोनाचा व्हायरस हवेतून पसरत असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. विशेष म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील शिक्कामोर्तब केला आहे.
कोरोना विषाणू हा प्रामुख्याने वॉटर ड्रॉपलेट्सद्वारे पसरतो, असे मानले जात होते. एखादी जवळची व्यक्ती तुमच्यासोबत संपर्कादरम्यान खोकल्यामुळे, शिंकण्यामुळे किंवा बोलताना नकळत बाहेर पडणाऱ्या थुंकीद्वारे कोरोना विषाणू पसरतो, असे आतापर्यंत मानले जाते होते. पण आता एका संशोधनातून समोर आलेल्या अहवालानुसार, कोरोना विषाणू हवेतून पसरतो, यावर जागतिक आरोग्य संघटनेने मान्य केले आहे.
हवेतील लहान कणांचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ लिन्सी मार यांच्यासह त्यांच्या टीमने केलेल्या संशोधनाचा अहवाल जागतिक आरोग्य संघटने समोर ठेवला होता. वैज्ञानिकांनी केलेल्या या संशोधनाला जागतिक आरोग्य संघटनेने मान्य केले आहे. कोरोना विषाणू हा हवेतून पसरतो, ही माहिती आता त्यांनी अधिकृत संकेतस्थळावर समाविष्ट केली आहे.