Sunday, May 11, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

अमरावतीत इमारत कोसळली! चार जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

अमरावतीत इमारत कोसळली! चार जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

अमरावती : अमरावती शहरातील प्रभात चौक परिसरात इमारत कोसळल्यामुळे खळबळ उडाली आहे. या इमारतीखाली तीन ते चार लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची असल्याची प्राथमिक माहिती असून या ढिगाऱ्यातून एक जणाला सुरक्षित बाहेर काढण्यात यंत्रणाना यश आले आहे. दरम्यान या ठिकाणी मदतकार्य सुरू आहे.


मुख्य बाजारातील प्रभास टॉकिज च्या बाजूला असलेली जुनी दोन मजली इमारत महानगरपालिकेने सात वेळा नोटीसा दिल्या होत्या, त्यानंतर मालकाने वरचा मजला हटवला होता. मात्र खालच्या मजल्यावर सिलींगचे काम सुरू असताना ही इमारत कोसळल्याचे सांगण्यात येत आहे.


इमारत कोसळल्याने या इमारतीत असणाऱ्या अनेक दुकान मालकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. इमारत कोसळताच घटनास्थळी महापालिका प्रशासनाचे बचाव पथक पोहोचले असुन; इमारतीच्या ढिकार्‍याखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे.

Comments
Add Comment