अभिनेत्री शर्लिन चोप्राकडून साजिद खान विरोधात लैंगिक छळाची तक्रार

मुंबई : दिग्दर्शक साजिद खान 'बिग बॉस' १६ मध्ये दाखल झाल्यापासून जुनी प्रकरण पुन्हा चर्चेत आली आहेत. बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोप्रा हिने साजिद विरोधात लैंगिक छळाची तक्रार दाखल केली आहे. शनिवारी रात्री जुहू पोलीस ठाण्यात शर्लिनने तक्रार दाखल केली.


साजिद खानला लवकरात लवकर पोलीस जवाब नोंदवण्यासाठी बोलावतील अशी प्रतिक्रिया देखील शर्लीनने दिली आहे. शर्लिनचा जुहू पोलिसांनी शनिवारी रात्री संध्याकाळी जबाब नोंदवला आहे. त्यावेळी शर्लिनने माध्यमांशी संवाद साधला. ती म्हणाली की, महिला पोलीस अधिकाऱ्यांनी माझे स्टेटमेंट रेकॉर्ड केले आहे. तसेच, पोलिसांनी आश्वासन दिले आहे की, ते साजिद खानला लवकरात लवकर बिग बॉसच्या घरातून बोलवून त्याचा जबाब नोंदवणार आहेत.


दिग्दर्शक साजिद खान बिग बॉस सीझन १६ मधील स्पर्धक आहे. साजिद सध्या हिंदी बिग बॉसच्या घरात आहे. सदस्य अब्दूचा ट्रान्सलेटर म्हणून साजिद बिग बॉसच्या घरात आहे. साजिद स्पर्धक म्हणून सहभागी झालेला नाही. त्यामुळे तक्रार दाखल झाल्यानंतर साजिद बिग बॉसमधून बाहेर येण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

ब्रँड विरुद्ध ब्रँडी: फडणवीस-ठाकरे गटात शाब्दिक युद्ध, राजकारण तापले!

मुंबई: बेस्ट (BEST) निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात 'ब्रँड' विरुद्ध 'ब्रँडी' असा नवा वाद सुरू झाला आहे.

मेट्रोमुळे टॅक्सी आणि रिक्षा चालक धास्तावले!

'मेट्रो लाइन ३' दक्षिण मुंबईतील प्रवासात क्रांती घडवेल मुंबई: दक्षिण मुंबईत सध्या विकसित होत असलेली 'मेट्रो लाइन

मुंबई भाजपची डबेवाल्यांसाठी नेत्र तपासणी शिबिर, 'आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा' उपक्रमाची सुरुवात

पुढील दिवसांत भाजप कार्यकर्ते घरोघरी जाऊन मुंबईकरांचे अभिप्राय आणि मते जाणून घेतील - अमीत साटम मुंबई :

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल गणेशोत्सव झाला कि वेध लागतात नवरात्रीचे.

दिवाळीनंतर तीन टप्प्यात होणार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ?

मुंबई : महाराष्ट्रात दिवाळीनंतर तीन टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. राज्य निवडणूक आयोग

वांद्र्यातील स्कायवॉक वर्षअखेर होणार सुरू

अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगरांकडून कामांची पाहणी मुंबई (खास प्रतिनिधी): वांद्रे रेल्वे स्थानक ते महाराष्ट्र