रत्नागिरी : नागपूर-मडगाव-नागपूर ही विशेष साप्ताहिक गाडी गणपती उत्सवाच्या काळात सुरू झाली. त्यावेळी संगमेश्वर रोड रेल्वे स्टेशन थांबा होता. गणपतीनंतर ही गाडी कायमची बंद करणार, अशी चर्चा सुरू झाल्यानंतर संगमेश्वर रोड स्थानकाचा थांबा रद्द करण्यात आला.
या अन्यायाला वाचा फोडण्याची लढाई सुरू करण्यात आली व त्याला यश मिळाले असून, नागपूर-मडगाव या विशेष साप्ताहिक गाडीला पुन्हा संगमेश्वर रोड थांबा मिळणार आहे. ‘निसर्गरम्य चिपळूण-निसर्गरम्य संगमेश्वर’ या फेसबुक ग्रुपच्या मागणीची दखल कोकण रेल्वेने घेतली आहे.