नाशिक : मालेगाव, झोडगे येथे दिवाळीच्या सणात एकाच दिवशी तीन कृषी सेवा केंद्र व एक इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्रीचे दुकान चोरट्यांनी फोडून रोख रक्कमेसह कांदा बियाणे चोरून नेल्याने व्यवसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
भरवस्तीतील बिजाई कृषी सेवा केंद्रात रात्री तीननंतर चोरट्यांनी मुख्य शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर गल्ल्यातील सुमारे वीस ते पंचवीस हजार रुपये रोख तसेच नामांकित कंपनीचे कांदा बियाणे सुमारे वीस किलो ज्याची किंमत तीस ते चाळीस हजार रुपये आहे, असे पोत्यात भरून पोबारा केला. या घटनेचे दुकानात असलेल्या सीसीटीव्हीमध्ये चित्रीकरण झाले असून शेजारी असलेल्या शुभम इलेक्ट्रॉनिक्स दुकानांचे कुलूप तोडले.
मात्र चोरीचा प्रयत्न अपयशी ठरला. तर शिवकृपा कृषी सेवा केंद्रात सुमारे पंधरा हजार रुपये किंमतीचे कांदा बियाणे चोरट्यांनी चोरून नेले. कांदा मार्केट शेजारील ज्ञानेश्वरी कृषी सेवा केंद्रात कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न केला.