Wednesday, April 23, 2025
Homeमहामुंबईदिवाळीत फटाक्यांमुळे ४० टक्के प्राणी जखमी

दिवाळीत फटाक्यांमुळे ४० टक्के प्राणी जखमी

मुंबई (वार्ताहर) : दिवाळीचा सण हा आनंदाचा, समाधानाचा आणि सर्वत्र फटाक्यांचा आवाजाचा समजला जातो. मात्र, काही ठिकाणी या फटाक्यांच्या आनंदात दु:खदही घटना घडतात. यंदा मुंबईत या फटाक्यांच्या अतषबाजीत सुमारे ४० टक्के प्राणी जखमी झाले आहेत. दरम्यान, ही संख्या दरवर्षी वाढत आहे असे निरीक्षण डॉ. राजीव गायकवाड यांनी दिली आहे.

अनेक वेळा मोठ्या फटाक्यांच्या आवाजामुळे घरातून गॅलरीमध्ये झोपेत असलेले मांजर किंवा कुत्रा घाबरून खाली पडतात, त्यामुळे ते जखमी होतात असेही पाळीव कुत्रे आणि मांजर रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर एक कुत्र्याच्या तोंडात समाजकंटकांनी बॉम्ब फोडल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या कुत्र्याला उपचारासाठी रुग्णात आणले होते. मात्र, जखम एवढी भयानक होती. की, त्या कुत्र्याचा मृत्यू झाला अशा गंभीर घटना दिवाळीत प्राण्यांसोबत घडत असतात त्यामुळे दिवाळी साजरी करत असताना, फटाके फोडत असताना खास करून प्राण्यांची काळजी घेतली गेली पाहिजे यासाठी जनजागृती होणे गरजेचे आहे. मात्र, दरवर्षी दिवाळीतील दिवसांच्या दरम्यान प्राण्यांच्या जखमी होण्याच्या घटना वाढत आहेत. सध्या या घटनांमुळे रुग्णालयात २२ श्वान, ६ मांजर, १५ कबुतर, २ घारी आणि २ वटवागूळ यांच्यावर उपचार सुरू आहे.

प्राणी मित्र आणि प्लांट अँड ऍनिमल वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष सुनील कुंजू यांनी दिवाळीच्या आधीही फटाके मुक्त दिवाळी साजरी करा, फटाके वाजवताना मुख्य प्राण्यांची काळजी घ्या असे आवाहन केले होते. मात्र, तरीही बऱ्याच ठिकाणी फटाक्यांमुळे प्राणी आणि पक्षी भाजल्याच्या घटना घडल्याने खंत व्यक्त केली आहे. यासाठी प्राणी संघटनांकडून बरीच जनजागृती केली जात आहे. तसेच, प्राण्यांना त्रास देणाऱ्यांच्या विरोधात प्राणीकृता कायद्यांतर्गत कारवाई केली जाते. मात्र, यापेक्षाही अधिक जनजागृती करण्याची आवश्यकता असल्याचाही सुनिश कुंजू यांनी सांगितले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -