इस्लामाबाद (वृत्तसंस्था) : परदेशी नेत्यांकडून मिळालेल्या भेटवस्तूंच्या विक्रीतून मिळालेली रक्कम लपवून ठेवल्याचा ठपका माजी पंतप्रधान इम्रान खानवर यांच्यावर ठेवण्यात आला होता. त्याप्रकरणी निवडणूक मंडळाने पाच वर्षासाठी सार्वजनिक पदावर राहण्यास अपात्र ठरवले होते. त्यानंतर आता इम्रान खान यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
इम्रान खान यांनी सरकारच्या विरोधात एका मोर्चाचे आयोजन केले आहे. त्या मोर्चात सहभागी होण्यासाठी इम्रान खान यांनी वकिलांना निमंत्रण दिले. तेथून बाहेर पडताना तेथे असलेल्या लोकांनी इम्रान खान यांच्याविरोधात पाकिस्तानी नागरिकांनी घोषणाबाजी केली.
लोकांनी त्यांच्याविरोधात ‘घडी घडी चोर’च्या अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. यानंतर इम्रान खान यांच्या सुरक्षा रक्षकांनी तेथे उपस्थित असलेल्या लोकांना तेथून हाकलून लावल्याचं व्हिडीओत दिसत आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.