मुंबई : ‘वेदांता-फॉक्सकॉन’ प्रकल्पानंतर आता ‘एअरबस- टाटा’ यांचा हवाई दलासाठी विमाननिर्मितीचा सुमारे २२ हजार कोटींचा प्रकल्पही गुजरातला गेला आहे. याचे खापर भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी तत्कालीन उद्योगमंत्री आणि महाविकास आघाडीवर फोडले आहे. मला तोंड उघडायला लावू नका, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
“येणाऱ्या प्रत्येक उद्योगाकडे किती टक्के मागत होतात हे आधी सुभाष देसाई यांना विचारायला हवं. भूषण देसाई कोणाकोणाला भेटत होते? दुबईत कशा बैठका होत होत्या? किती टक्क्यांची दलाली घेतली जात होती? मातोश्रीला किती टक्के पोहोचवायचं सांगितलं जात होतं? या गोष्टी जर आम्ही काढत बसलो तर मोठं प्रकरण समोर येईल. किती उद्योगांकडून किती पैसे घेतले, फाईल कशा फिरल्या याची सर्व माहिती प्राप्तिकर विभाग आणि सीबीआयकडे आहे. सुभाष देसाई यांनी आम्हाला तोंड उघडायला लावू नये,” असा इशाराही प्रसाद लाड यांनी दिला आहे.
“महाविकास आघाडी जनतेची दिशाभूल करत आहे. २१ सप्टेंबर २०२१ मध्येच एअरबस- टाटा प्रकल्प परत गेला होता. मला तर तेव्हाच्या उद्योगमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना तेव्हा प्रकल्प का नाकारला गेला हे विचारायचे आहे. सुभाष देसाई यांनी याचे उत्तर दिले पाहिजे,” असा सवाल प्रसाद लाड यांनी केला आहे.
“आम्ही पुराव्याशिवाय बोलत नाही. सुभाष देसाईच नव्हे तर संपूर्ण महाविकास आघाडीबद्दल हे सिद्ध झाले आहे. नवाब मलिक, अनिल देशमुख यांचा भ्रष्टाचार सिद्ध झाला आहे. अनिल परब यांची चौकशी सुरु आहे. संजय राऊत यांचे पत्राचाळ प्रकरण आहे. सुभाष देसाई ज्येष्ठ नेते आहेत, आम्ही त्यांचा वयाचा, अनुभवाचा आदर करतो. पण त्यांनी अशाप्रकारे शिंदे, फडणवीस यांच्यावर आरोप करण्याआधी आपल्या टोपलीखाली झाकून पाहावे,” असा सल्ला प्रसाद लाड यांनी दिला आहे. वेळ पडल्यास पुरावे समोर आणू असेही ते म्हणाले.
दरम्यान, “प्रकल्प वर्षभरापूर्वी गेला असता तर माध्यमांनी आज का बातम्या दिल्या? दोन दिवसांनी भूमीपूजन होणार असून ही तारीख आम्ही दिलेली नाही. हेच खरे असून यापासून पळ काढता येणार नाही,” असे सुभाष देसाई म्हणाले. प्रसाद लाड यांच्या टक्केवारीच्या आऱोपावर बोलताना ते संतापले. “खबरदार, असले आरोप सहन करणार नाही. ज्यांना आरोप करायचे आहेत त्यांनी पुरावे द्यावेत. किती बालीशपणे बोलत आहेत”.
माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…
वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…
भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…