सिडनी (वृत्तसंस्था) : टी-२० विश्वचषक स्पर्धेत दुबळ्या झिम्बाब्वेविरुद्ध गुरुवारी झालेला पराभव पाकिस्तानी खेळाडूंच्या जिव्हारी लागला आहे. सोशल मिडियावर तर पाक खेळाडूंना मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जात आहे. झिम्बाब्वेविरुद्ध अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या अत्यंत रोमहर्षक अशा सामन्यात पाकिस्तानला पराभवाची चव चाखावी लागली. पाकिस्तानच्या या धक्कादायक पराभवानंतर क्रिकेट जगतात फक्त याच सामन्याची चर्चा होताना दिसत आहे.
पाकिस्तानचा हा पराभव पाकिस्तानी खेळाडूंच्या चांगलाच जिव्हारी लागला असून कर्णधार बाबरची सामन्यानंतरची रिएक्शन व्हायरल होत आहे. अष्टपैलू शादाब खान तर चक्क रडतानाचा व्हीडिओ व्हायरल होत आहे. या व्हीडिओमध्ये शादाब पाकिस्तानी ड्रेसिंग रूमच्या बाहेर गुडघ्यावर बसून चक्क रडताना दिसत आहे.
झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात शादाब खानने चमकदार कामगिरी केली. चार षटकांच्या स्पेलमध्ये केवळ २३ धावा देत त्याने गोलंदाजीत तीन विकेट्स घेतले. शादाबने फलंदाजीतही चमकदार कामगिरी करत १७ धावा केल्या. पण तरीही पाकिस्तान सामना जिंकू न शकल्याने अखेर शादाबला रडू कोसळले.
सलग दोन सामने हरल्यानंतर बाबरच्या टीमला खूप ट्रोल केले जात आहे. इंटरनेटवर पाकिस्तानबद्दल अनेक मीम्स शेअर केले जात आहेत. भारताला पराभूत करण्याच्या इराद्याने आलो होतो, इथे तर झिम्बॉब्वे सुद्धा भारी पडली, खूप मोठा अपमान झाला मित्रा..!, आता नवाझला मी पण टार्गेट करणार…, चलो ..पाकिस्तान, आता तुम्ही रडणार…आणि मी हसणार, इतका आनंद मला यापूर्वी कधीही झाला नाही…, हैदर शुन्यावर बाद झाल्यानंतर…., तुम्ही लोक आता रडणे थांबवा…, विश्वचषकात पाक सामना हरल्यानंतर झालेली …परिस्थिती, पाक सामना हरला कारण जिंकल्यानंतर, इंग्लिशमध्ये बोलावे लागते…, सेमी फायनल मध्ये जाण्यापूर्वीच …घरी प्रस्थान, बाबर हा फक्त आता शो पुरताच उरला, पाक टीम सध्या रेल्वेने घरी जाण्यासाठी पात्र झाली आहे अशा आशयाचे मीम्स सध्या व्हायरल होत आहेत.