Thursday, November 7, 2024
Homeदेश‘स्विगी’ला मोठा धक्का! ९०० रेस्टॉरंट अ‍ॅपच्या बाहेर

‘स्विगी’ला मोठा धक्का! ९०० रेस्टॉरंट अ‍ॅपच्या बाहेर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फूड डिलिव्हरीनंतर रेस्टॉरंट्स आणि फूड टेक प्लॅटफॉर्म स्विगी आणि झोमॅटो यांच्यातील लॉगआउटची लढाई आता डाइन-इनवर आली आहे. गेल्या काही काळात शेकडो ए-लिस्ट रेस्टॉरंट्सने स्विगी डायनआउटमधून स्वतःहून बाहेर काढले आहे. जवळपास ९०० डायनिंग आउटलेटने स्विगीमधून स्वतःला डिलिस्ट करण्यासाठी नोटिसा पाठवल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

‘स्विगी डाईनआऊट’ मधून काढून टाकण्यात आलेली रेस्टॉरंट्स म्हणजे इंडिगो हॉस्पिटॅलिटी, इंप्रेसारियो एंटरटेनमेंट अँड हॉस्पिटॅलिटी आणि सिमरिंग फूड्स अँड रेस्टॉरंट्स यासारख्या इतर हॉस्पिटॅलिटी संस्था आहेत. यामध्ये स्मोक हाऊस डेली आणि मामागोटो, वाह मोमोस आणि चायोस सारख्या ब्रँडचा समावेश आहे.

‘स्विगी डाईनआऊट’ वरून हटवण्यात आलेल्या रेस्टॉरंट्सनी त्यांचे बाहेर पडण्याचे कारण सांगितले आहे. त्यांच्या ग्राहकांना प्लॅटफॉर्मद्वारे दिल्या जाणाऱ्या सवलतींमुळे रेस्टॉरंट व्यवसायाला फटका बसत आहे. स्विगी डायनआउट अॅपवर ग्राहकांना मोठ्या प्रमाणात सूट मिळत असून याचा रेस्टॉरंटचा डायन-इन बिझनेस पूर्णपणे बिघडेल अशी रेस्टॉरंट चालकांना भीती आहे.

स्विगी डायनआउटवरील रेस्टॉरंट भागीदारांना स्वतःच्या सवलती ठरवण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. रेस्टॉरंट हटवणाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. मात्र, या परिस्थितीला कसे सामोरे जाता येईल, यासाठी आम्ही एनआरएआयच्या प्रतिनिधींशी चर्चा करत आहोत असं स्पष्टीकरण स्विगीच्या प्रवक्त्याने दिले आहे.

डिलिस्ट केल्यानंतर रेस्टॉरंट स्विगीच्या सर्चमध्ये दिसेल. परंतु ग्राहक रेस्टॉरंटमध्ये जाऊन त्याच्याकडून सवलत किंवा कॅशबॅक सुविधा घेऊ शकत नाहीत. डायनआउट सुविधा आजमितीला सुमारे २० शहरांमध्ये एकूण १५,००० रेस्टॉरंट्ससह कार्यरत आहे. आम्ही आमच्या भागीदार रेस्टॉरंटशी वेळोवेळी संवाद साधतो. जेणेकरून आम्ही त्यांच्या गरजा समजू शकू आणि या भागीदारी चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करू शकू, असे स्विगीकडून सांगण्यात आले आहे. २०१२ मध्ये सुमारे ५०,०००रेस्टॉरंटसह डायनआउट सुरू झाले. या करारानंतर स्विगीने ९८९ कोटी रुपयांच्या रेस्टॉरंट सूची व्यवसायातही प्रवेश केला होता जिथे झोमॅटो या क्षेत्रात अनेक वर्षांपूर्वी कार्यरत होता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -