विरार (प्रतिनिधी) : नालासोपाऱ्यात प्रेयसीच्या मदतीने एका पोलिसाने दारू पाजून विवाहित महिलेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलीस आणि त्याच्या प्रेयसीविरोधात नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकारामुळे पोलीस वर्तुळात खळबळ माजली आहे. राहुल लोंढे आणि प्रिया उपाध्याय, असे बलात्काराचा गुन्हा दाखल झालेल्या आरोपींचे नाव आहे.
राहुल लोंढे हा वसई पोलीस ठाण्यात पोलीस नाइक पदावर कार्यरत आहे. तर प्रिया उपाध्याय ही त्याची प्रेयसी आहे. राहुल लोंढे त्याची प्रेयसी प्रिया उपाध्याय यांनी संगनमत करून, ३१ वर्षीय विवाहित महिलेला नालासोपारा येथील प्रेयसीच्या घरी बोलावून, त्याठिकाणी तिला दारू पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप पीडित महिलेने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत केला आहे.
तसेच कुणाला सांगितले तर जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत. पीडित महिलेने हा संपूर्ण प्रकार आपल्या पतीला सांगितल्यावर त्याने ऑनलाइन ई-मेलद्वारे मुख्यमंत्री, मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तालय यांना तक्रार दाखल केल्या नंतर, १८ ऑक्टोबरला नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून सध्या दोन्ही आरोपी फरार आहेत.
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…