इमारतीचा स्लॅब रस्त्यावर कोसळल्याने गाड्यांचे नुकसान
मुंबई : मुंबईतील बोरिवलीच्या पश्चिम भागात सात मजल्याची धोकादायक इमारत कोसळल्याची घटना समोर आली आहे. यात अद्याप किती जीवित वा वित्तहानी झाली याबाबतची माहिती समोर येऊ शकलेली नाही. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बोरिवली पश्चिमेकडील वजीरा नाका, प्रणय नगर येथील या धोकादायक स्थितीतील सात मजली इमारतीचे पाडकाम सुरू असतानाच इमारतीचा एक भाग बाजूला असलेल्या रस्त्यावर कोसळला. त्या ठिकाणी चार ते पाच चारचाकी गाड्या उभ्या होत्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गाड्यांचे नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.