Monday, June 16, 2025

बायकोला साडीही देऊ शकत नाही तो मर्द कसला?

बायकोला साडीही देऊ शकत नाही तो मर्द कसला?

मुंबई : आपल्या बायकोला जो माणूस साडीही देऊ शकत नाही तो मर्द कसला? असे खळबळजनक विधान करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांना डिवचले आहे.


आमदार शहाजी बापू पाटलांनी अनेकदा भाषणांमध्ये बोलताना त्यांची पूर्वीची स्थिती सांगितली आहे. आपल्या बायकोला साडीही घ्यायला पैसे नाही, असे विधान त्यांनी केले होते. यावर एकनाथ खडसेंनी आमदार शहाजी बापू पाटलांवर निशाणा साधला आहे. आपल्या बायकोला जो माणूस साडीही देऊ शकत नाही तो मर्द कसला? शहाजी बापूंची परिस्थिती आमदार झाल्यापासून सुधारली आहे, असेही खडसे म्हणाले.

Comments
Add Comment