Tuesday, July 8, 2025

गिरगावमधील पुंगालिया हाऊस कंपाऊंडमध्ये भीषण आग

गिरगावमधील पुंगालिया हाऊस कंपाऊंडमध्ये भीषण आग

मुंबई : गिरगाव येथील पुंगालिया हाऊस कंपाऊंडमध्ये भीषण आग लागल्याची घटना आज मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या आगीत पाच ते सहा मोटार कारबरोबर आठ ते दहा दुचाकी जळून खाक झाल्या. तर कंपाऊंडमध्ये ठेवलेले लाखो रुपयांचे कपडे, प्लास्टिक आणि नायलॉनचे रोल जळून खाक झाले. तसेच बाजूच्या दोन घरांनाही आग लागली. फटाक्याने ही आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.


घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. स्थानिक नागरिक, पोलीस आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र नागरिकांचे कोट्यवधी रुपयांचे या आगीमुळे नुकसान झाले आहे.

Comments
Add Comment