मुंबई : दिवाळीच्या सुट्टीनंतर आज सकाळी कामावर निघालेल्या चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागला. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती. यामुळे अंबरनाथहून कर्जतकडे जाणारी लोकलसेवा ठप्प झाली होती.
मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी ट्वीट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे. रेल्वे प्रशासनाने तत्काळ तांत्रिक बिघाड दूर केला असून, लोकल सेवा पूर्ववत झाल्याची माहिती सुतार यांनी दिली.
Due to technical problem in S-3 CSMT-Karjat local between Ambarnath and Badlapur on Dn line, local services on Ambarnath -Karjat section are delayed.
— Shivaji M Sutar (@ShivajiIRTS) October 27, 2022
एस-३ सीएसएमटी- कर्जत लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती. कर्मचा-यांनी तत्काळ दुरुस्ती करत तांत्रिक बिघाड दूर केला आहे. त्यानंतर सकाळी ७.५० वाजता रेल्वे वाहतूक पुन्हा सुरु झाल्याचे, त्यांनी सांगितले.
दरम्यान, लोकल सेवा पूर्ववत झाली असली, तरी काही काळ लोकल विलंबानेच धावत होत्या. त्यामुळे कार्यालय गाठण्यासाठी बाहेर पडलेल्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.