Saturday, July 5, 2025

ऋषी सुनक यांची चित्रपटाला शोभेल अशी लव्हस्टोरी

ऋषी सुनक यांची चित्रपटाला शोभेल अशी लव्हस्टोरी

लंडन (वृत्तसंस्था) : भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे. ऋषी सुनक आणि अक्षता मूर्ती यांची लव्हस्टोरीही अगदी फिल्मी स्टाईल आहे. कॉलेजमधल्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले आणि दोघांनीही बंगळुरूमध्ये लग्नगाठ बांधली.


ऋषी सुनक यांनी त्यांचे सुरुवातीचे शिक्षण इंग्लंडमधील 'विंचेस्टर कॉलेज'मधून केले. त्यांनी पुढील शिक्षण ऑक्सफर्डमधून केले. २००६ मध्ये त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून एमबीएची पदवीही मिळवली. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये एमबीएच्या शिक्षण घेत असताना ऋषी सुनक आणि अक्षता मूर्ती यांची भेट झाली. पुढे मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. २००९ मध्ये दोघांनी बंगळुरूमध्ये भारतीय परंपरेनुसार लग्न केले. इंग्लंडमध्ये अक्षता यांचा स्वतःचा फॅशन ब्रँड आहे. अक्षता या इंग्लंडमधील सर्वात श्रीमंत महिलांपैकी एक आहेत. सुनक दाम्पत्याला कृष्णा आणि अनुष्का या दोन मुली आहेत.


भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे. लवकरच ऋषी सुनक पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. पहिल्यांदाच भारतीय वंशाचे व्यक्ती ब्रिटनचे पंतप्रधान झाले आहेत. ऋषी सुनक यांनी रविवारी कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत विजय मिळवला. भारतीय म्हणून ब्रिटनच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेणारे ते पहिले भारतीय आहेत. ऋषी सुनक भारतीय वंशाचे आहेत. त्यांचे आजोबा पंजाबचे होते. ऋषी यांची पत्नी अक्षता मूर्ती देखील भारतीय आहे. अक्षताचे वडील एन नारायण मूर्ती हे मोठे उद्योगपती आहेत.

Comments
Add Comment