Thursday, July 25, 2024
Homeताज्या घडामोडीदिवाळीच्या सुट्टीत राणी बाग फुल्ल

दिवाळीच्या सुट्टीत राणी बाग फुल्ल

दिवसभरात २५ हजारांहून अधिक पर्यटकांची सैर

मुंबई (प्रतिनिधी) : दिवाळीची सुट्टी असल्याने सध्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय अर्थात राणी बागेत पर्यटकांनी केली आहे. मंगळवारी २५ हजारांहून अधिक पर्यटकांनी राणीबागेची सैर केली.

सध्या दिवाळीच्या सणांमुळे सुट्ट्या सुरू आहेत. त्यामुळे पर्यटक मोठ्या संख्येने राणीबागेची सैर करत आहेत. मंगळवारी सुमारे २५,०२९ पर्यटकांनी राणी बागेला भेट दिली. बागेच्या आत आणि बाहेर पर्यटकांची गर्दी झाली होती. मंगळवारी पर्यटकांमुळे उद्यान विभागाला ९,५७,८२५ रुपयांचा महसूल मिळाला आहे. गेल्या ५ दिवसांत उद्यानात ७४,३५० पर्यटकांनी भेट दिली असून त्यातून २८,८९,७१० रुपयांचा महसूल जमा झाला आहे.

सध्या उद्यान-प्राणिसंग्रहालयात एकूण १३ जातींचे ८४ सस्तन प्राणी, १९ जातींचे १५७ पक्षी व ७ जातींचे ३२ सरपटणारे तसेच जलचर प्राणी असे एकूण २७३ प्राणी, पक्षी आहेत. म्हणजेच राणीबागमध्ये सध्या शंभरहून अधिक प्राणी आहेत. विविध ३० प्रजातींचे सुमारे २५० पक्षी पर्यटकांना या ठिकाणी पाहायला मिळतात. याशिवाय बागेतील २८६ प्रजातींची सुमारे साडेतीन हजार झाडे, दुर्मिळ वृक्ष पाहण्यासाठी अनेक वृक्षप्रेमी राणीबागेत हजेरी लावतात. पेंग्विन हा पर्यटकांचे खास आकर्षण बनला आहे. याशिवाय बाराशिंगा, तरस, अस्वल, बिबट्या, वाघ यांसारखे प्राणी व रॉयल बंगाल वाघांची जोडी बघण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत.

वार पर्यटक महसूल

शुक्रवार ३,०४८ १,५३,२५०
शनिवार ८,५७९ ३,३१,३१०
रविवार १७,४९८ ६,५५,६७५
सोमवार २०,१९६ ७,९१,६५०
मंगळवार २५,०२९ ९,५७,८२५

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -