Friday, July 19, 2024
Homeदेशलक्झरी बसमध्ये दिवे लावणे जीवावर बेतले

लक्झरी बसमध्ये दिवे लावणे जीवावर बेतले

चालक, क्लिनर दोघेही जिवंत जळाले

रांची : रांचीमध्ये आज रात्री एक हृदयद्रावक घटना घडली. लोअर बाजार पोलीस ठाणे भागात खादगढा बस स्टँडवर बसमध्ये झोपलेल्या ड्रायव्हर आणि कंडक्टरचा जळून मृत्यू झाला. दिवाळीच्या रात्री बसमध्ये हे दोघे दिवे लावून झोपले होते, असे सांगितले जात आहे.

रात्री अचानक बसला आग लागली. यामुळे त्यांचा होरपळून मृत्यू झाला. बसला आग लागल्याची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाला याची माहिती देण्यात आली. अग्निशमन दल पोहोचेपर्यंत बस जळून खाक झाली होती. पोलिसांनी बसमध्ये सापडलेल्या अर्धावस्थेत जळालेले दोन मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठविले आहेत.

दिल्लीतील पितमपुरा भागातील एका रेस्टॉरंटलाही आग लागली होती. गोदामे, गाड्या, घरांना आगी लागल्याच्या घटना घडल्या आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -