कार्तिकने मानले अश्विनचे आभार

  90

मेलबर्न (वृत्तसंस्था) : पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर भारताचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने रविंचंद्रन अश्विनचे आभार मानले आहेत. बीसीसीआयने एक व्हीडिओ जारी केला आहे. त्यात दिनेश कार्तिक आर. अश्विनचे आभार मानताना दिसत आहे.


बीसीसीआयच्या या व्हीडिओत दिनेश कार्तिक म्हणाला की, 'काल मला वाचवल्याबद्दल तुझे आभार अश्विन. यावर अश्विन देखील हसताना दिसत आहे. जर भारताने हा सामना गमावला असता तर सर्वाधिक टीका ही दिनेश कार्तिकवर झाली असती. कारण दिनेश कार्तिकने मॅच फिनिशर म्हणून भारतीय संघात पुनरागमन केले आहे. त्यात दोन चेंडूंत दोन धावांची आवश्यकता असताना पायावर टाकलेल्या चेंडूला स्वीप करणे कार्तिकला जमले नाही. हा चेंडू स्टम्पजवळच राहिला होता. यष्टीरक्षक स्टम्पजवळ असल्याने धाव घेणे अशक्यच होते. पण तरीही धाव घेण्याच्या अशक्यप्राय प्रयत्नात कार्तिकने आपली विकेट गमावली.


कार्तिक बाद झाल्यानंतर भारताला एका चेंडूत २ धावांची आवश्यकता होती. नवा फलंदाज अश्विन स्ट्राईकवर होता. लेग साईडला टाकलेल्या एका चेंडूवर अश्विन शफल झाला. पंचांनी हा चेंडू वाईड म्हणून घोषित केला. भारताला विजयासाठी एका चेंडूत एका धावाची आवश्यकता होती. शेवटच्या चेंडूवर अश्विनने मीड ऑफच्या डोक्यावरून चौकार लगावत भारताला विजय मिळवून दिला. जर भारताने सामना गमावला असता तर सर्वाधिक टीका ही दिनेश कार्तिकवर झाली असती. त्यामुळेच कार्तिकने अश्विनचे आभार मानले.


या व्हीडिओत दिनेश कार्तिक आणि अश्विन यांच्याव्यतिरिक्त हार्दिक पंड्या आणि विराट कोहली देखील संघाच्या बसमधून उतरताना दिसत आहेत. पंड्याने आपला मुलगा अगस्तला कडेवर घेतले होते. त्याच्यासोबत त्याची पत्नी नताशा देखील होती.

Comments
Add Comment

UAE मध्ये आशिया चषक क्रिकेट स्पर्धा

अबुधाबी : आशिया चषक क्रिकेट स्पर्धा संयुक्त अरब अमिराती अर्थात यूएई येथे होणार असल्याचे वृत्त आहे. आशियाई

Ind vs Eng: भारत वि इंग्लंड दुसऱ्या कसोटीला आजपासून सुरूवात

मुंबई: कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यातील ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत

Mohammad Shami: कोलकाता उच्च न्यायालयाकडून मोहम्मद शमीला मोठा झटका

नवी दिल्ली: कोलकाता उच्च न्यायालयाकडून क्रिकेटर मोहम्मद शमीला मोठा झटका बसला आहे. उच्च न्यायालयाने शमीला त्याची

Bangalore stampede : 'पोलीस हे काही देव अथवा जादूगार नाहीत', बंगळुरू चेंगराचेंगरीसाठी RCB जबाबदार

बंगळुरू: केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकारणे ४ जूनला बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या

बॅडमिंटनपटू आयुष शेट्टीने रचला इतिहास

जिंकले पहिले बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर विजेतेपद नवी दिल्ली : भारताचा युवा बॅडमिंटनपटू आयुष शेट्टीने यूएस ओपन

'कॅप्टन कूल' या प्रसिद्ध टोपणनावाच्या ट्रेडमार्कसाठी धोनीचा अर्ज

नवी दिल्ली : महेंद्रसिंग धोनीने 'कॅप्टन कूल' या नावासाठी ट्रेडमार्क अर्ज दाखल केला आहे. हे नाव चाहते त्याच्या थंड