पुणे : दिवाळी सणात पु्ण्यात मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. त्यामुळे शहरातील विविध भागातील १७ ठिकाणी फटाक्यांमुळे आग लागल्याची घटना घडली.
घोरपडी येथील एका सोसायटीतील पार्किंग मध्ये फटाक्यांमुळे दुचाकींना आग लागली, त्यात आठ दुचाकी जळाल्या.
पर्वती पायथा परिसरातील जनता वसाहतीमधील गल्ली क्रमांक ४७ येथे एका झाडाला फटाक्यांमुळे आग लागली.
विश्रांतवाडीतील सिरीन हॉस्पिटलसमोर पेटत्या फटाक्यामुळे झाडाला आग लागली. तर कात्रजमधील आंबेगाव पठार येथील साईसिद्धी चौकातही आग लागल्याची घटना घडली. सोसायटीतील सदनिकेच्या गॅलरीत ठेवलेल्या साहित्यावर फटाक्यांची ठिणगी पडल्याने ही आग लागली होती.
वारजे माळवाडीत चैतन्य चौकातील युनिव्हर्सल सोसायटीत एका बंद सदनिकेत आग लागली.
रात्री साडेआठ वाजता घोरपडीतील बी. टी. कवडे रस्त्यावर बिटाटेल एनक्लेव्ह सोसायटीत फटाक्यांमुळे आग लागली. फटाक्यांमुळे पार्किंगमधील आठ दुचाकी पेटल्या. तर सिंहगड रस्त्यावरील नऱ्हे येथील ज्ञानदीप शाळेच्या छतावर पडलेल्या पालापाचोळ्याने पेट घेतला.