नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना रुग्णसंख्या सध्या नियंत्रणात असून देशात सोमवारी गेल्या १८८ दिवसांतील सर्वात कमी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशात चोवीस तासांत १३३४ नवीन कोरोना विषाणूच्या रुग्णांची नोंद झाली आहे. या नवीन कोरोना रुग्णांमुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४ कोटी ४६ लाख ४४ हजार ७६ झाली आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या २३ हजार १९३ वर घसरली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी नवीन आकडेवारी जारी करत ही माहिती दिली.
देशातील कोरोना रुग्णांमध्ये मोठी घट झाली आहे. रविवारच्या तुलनेत देशात ६६० रुग्णांची संख्या कमी झाली आहे. सोमवारी देशात १३३४ रुग्ण आढळले असून गेल्या २४ तासांत १६ रुग्णांचा मृत्यू झाला होता. रविवारी देशात १९९९४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद आणि चार रुग्णांचा मृत्यू झाला होता. भारतात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या २३ हजार ४३२ वरून २३ हजार १९३ वर घसरली आहे. देशातील कोरोना रुग्णांचा सकारात्मकता दर ०.०५ टक्के आणि पॉझिटिव्हीटी रेट १.५२ टक्क्यांवर आहे. तसेच देशातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.७६ टक्के आहे.
दिवसभरात कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे ४२ हजार ८६४ डोस देण्यात आले आहेत. राष्ट्रव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत एकूण २१९.५६ कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत. यामध्ये ९५ कोटी लोकांना दुसरा डोस आणि २२.०३ कोटी बूस्टर डोस देण्यात आले. सध्या देशात २३ हजार १९३ रुग्ण कोरोना उपचाराधीन आहेत. गेल्या २४ तासांत १ हजार ५५७ रुग्ण कोरोना संसर्गातून मुक्त झाले आहेत.
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…
पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…