Thursday, July 3, 2025

भारतीय वंशाचे ऋषी सुनक ब्रिटनचे नवे पंतप्रधान

भारतीय वंशाचे ऋषी सुनक ब्रिटनचे नवे पंतप्रधान

वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) : भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत. ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आपले नाव मागे घेतल्याने सोमवारी ऋषी सुनक यांचे नाव आघाडीवर होते.


ऋषी सुनक यांनी पेनी मॉर्डंटचा पराभव करून विजय मिळवला आहे. सुनक यांच्या समर्थनार्थ १८५ हून अधिक खासदार आहेत. तर पेनी मॉर्डंट यांना केवळ २५ खासदारांचा पाठिंबा मिळू शकला आहे. औपचारिक घोषणेनंतर, ऋषी सुनक हे २८ ऑक्टोबरला पंतप्रधानपदाची शपथ घेऊ शकतात आणि २९ ऑक्टोबरला मंत्रिमंडळाची स्थापना होऊ शकते.


ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचे नाव देखील होते. मात्र त्यांनी आपले नाव मागे घेतल्याने सोमवारी ऋषी सुनक यांच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेतृत्व हाती घेण्याची शक्यता अधिक वाढली. बोरिस जॉन्सन यांनी रविवारी रात्री पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून माघार घेतली होती.

Comments
Add Comment