Tuesday, April 22, 2025
Homeमहत्वाची बातमीपाकिस्तानी पत्रकाराची केनियामध्ये हत्या

पाकिस्तानी पत्रकाराची केनियामध्ये हत्या

नैरोबी (वृत्तसंस्था) : पाकिस्तानचे पत्रकार अर्शद शरीफ यांची केनियामध्ये हत्या करण्यात आली आहे. गोळ्या झाडून त्यांना ठार करण्यात आले आहे. पोलीस चकमकीत त्यांचा मृत्यू झाल्याचे समजते. शरीफ यांच्या पत्नीने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. “कृपया आमच्या कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करा. ब्रेकिंग न्यूजच्या नावाखाली आमच्या कुटुंबाचे फोटो, खासगी माहिती आणि रुग्णालयातील अखेरचे फोटो दाखवू नका,” अशी विनंती शरीफ यांच्या पत्नीने केली आहे.

“मी माझा मित्र, पती आणि आवडत्या पत्रकाराला आज गमावले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केनियामध्ये त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली,” असे ट्वीट अर्शद शरीफ यांची पत्नी झवेरिया सिद्दिकी यांनी केले आहे. अर्शद शरीफ यांना हत्येची भीती असल्याने पाकिस्तान सोडून दुबईत वास्तव्य केले होते. त्यांच्या काही जवळच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाळत ठेवली जात असल्याचा संशय आल्याने त्यांनी दुबईही सोडली होती. अफगाणिस्तानच्या हल्लेखोरांनी त्यांच्या हत्येचा कट रचल्याची माहिती आहे.

नैरोबी येथील बाहेरच्या भागात शरीफ यांची हत्या करण्यात आली. दरम्यान, केनियामधील पाकिस्तान उच्चायुक्तालय अद्याप या संबंधी अधिक माहिती घेत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी अर्शद यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे. आपल्याला धक्का बसला असल्याचे त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनीही शोक व्यक्त केला आहे. “सत्य बोलण्याची किंमत अर्शद यांना मोजावी लागली असून, त्यांच्या निर्दयी हत्येमुळे मला धक्का बसला आहे,” असे ते म्हणाले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -