Sunday, July 14, 2024
Homeदेश‘या’ दिग्गजांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा!

‘या’ दिग्गजांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा!

मुंबई : देशात मोठ्या उत्साहाने दिवाळी सण साजरा केला जात आहे. याच निमित्ताने देशाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक दिग्गजांनी देशवासीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रकाश आणि आनंदाच्या या पवित्र सणानिमित्त ज्ञानाचा आणि ऊर्जेचा दीप प्रज्वलित करून गरजूंच्या जीवनात आनंद आणण्याचा प्रयत्न करूया. सर्व देशवासियांच्या जीवनात सुख-समृद्धी येवो, अशी प्रार्थना मूर्मू यांनी शुभेच्छा देताना केली आहे.

उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांनीही दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी शुभेच्छा देता म्हटले आहे की, तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा! तेजस्वी प्रकाशाचा हा सण आपल्या जीवनात बुद्धी, मंगल आणि समृद्धी घेऊन येवो. झगमगत्या दिव्यांची आभा आपल्या देशाला आशा, आनंद, आरोग्य आणि समरसतेने उजळून टाकू दे अशी आशा धनखर यांनी व्यक्त केली आहे.

दिवाळीचा संबंध हा प्रकाश आणि आनंदाशी आहे. हा पवित्र सण आपल्या जीवनात आनंद आणि समृद्धीचा घेऊन येवो. तुम्हा सर्वांना उत्तम आरोग्य घेऊन लाभो दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा, असे ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

उजळली पहाट लक्ष लक्ष दिपज्योतींनी, सजले उंबरठे रांगोळ्यांच्या विविध रंगांनी… लाभो सुख-समृध्दी, आरोग्य, ऐश्वर्य, पूर्ण होवोत आपल्या साऱ्या इच्छा…, असे ट्वीट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. प्रकाशाचा हा सण सर्वांच्या आयुष्यात सुख, आरोग्य आणि भरभराट घेऊन येवो अशाप्रकारे गृहमंत्री अमित शहांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

दीपावलीचे हे मंगल पर्व आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समृध्दीचा प्रकाश घेऊन येवो! लक्ष्मीपूजनाच्या अनेक अनेक शुभेच्छा! असे ट्वीट करत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

तसेच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, शरद पवार, राज ठाकरे, प्रविण दरेकर, नितेश राणे, आशिष शेलार, अतुल भातखळकर, आदी अनेक दिग्गजांनी सुद्धा देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -