‘फिलिप्स’मधील चार हजार कर्मचाऱ्यांची होणार कपात

  87

लंडन (वृत्तसंस्था) : तंत्रज्ञान कंपनी फिलिप्सने जगभरातील चार हजार कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. एक निवदेन जारी करत लवकरच चार हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार असल्याची घोषणा फिलिप्सने केली आहे. कंपनीच्या उत्पन्नावर परिणाम झाल्याने हा निर्णय घेतल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. मागील काही महिन्यांपासून कंपनीला मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागत असल्याने उत्पादन घटले आहे. तसेच कंपनीच्या उत्पन्नावरही मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे हा कठीण निर्णय घेत असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.


फिलिप्सचे सीईओ रॉय जेकब्स यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ”कंपनीचे उत्पन्न वाढवण्यासाठी आम्हाला काही कठोर निर्णय घ्यावे लागत आहेत. इच्छा नसतानाही आम्ही जगभरातील चार हजार कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय आमच्यासाठी कठीण आहे. मात्र, काही कारणास्तव आम्हाला हा निर्णय घ्यावा लागतो आहे. गेल्या काही महिन्यांपासून कंपनीला महागाई, कोरोना आणि रशिया-युक्रेन युद्ध यामुळे अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो आहे. याचा परिणाम कंपनीच्या उत्पन्नावर पडला आहे. त्यामुळे नफा वाढवण्यासाठी आता आम्हाला आमच्या खर्चात कपात करावी लागणार असल्याचे जेकब्स यांनी सांगितले.


त्यानुसार कंपनी लवकरच चार हजार कर्मचाऱ्यांना घरी बसवणार आहे. जगभरातील विविध देशांमधील हे कर्मचारी आहेत. फिलिप्स या कंपनीचे उत्पन्न अलिकडच्या काळात घटले आहे. त्यामुळे कंपनीला हा कठीण निर्णय घ्यावा लागत असल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले. एक निवदेन जारी करत लवकरच चार हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार असल्याची घोषणा फिलिप्सने केली आहे.

Comments
Add Comment

आयएनएस तमाल भारतीय नौदलात

मॉस्को : आयएनएस तमाल ही युद्धनौका भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल झाली आहे. रडारपासून स्वतःचे अस्तित्व लपविणारी ही

Asim Munir: पाकिस्तानचा लष्करप्रमुख असीम मुनीर पुन्हा बरळला!

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देण्याच्या केल्या वल्गना इस्लामाबाद : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर

३५ हजारांचं कर्ज फेडलं नाही म्हणून हिंदू महिलेवर बलात्कार आणि मारहाण, आरोपीला अटक

ढाका : ३५ हजारांचं कर्ज असल्याने हिंदू महिलेला मारहाण करुन तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची गंभीर घटना

अल्लाहच्या शत्रूंना नेस्तनाबूत करू, ट्रम्प-नेतन्याहू यांच्याविरोधात इराणच्या शिया धर्मगुरूंचा फतवा

नवी दिल्ली: इराणचे शीर्ष शिया धर्मगुरूंनी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि इस्त्रायचे पंतप्रधान

रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा हवाई हल्ला, एफ-१६ लढाऊ विमानाचा पायलट ठार

क्वीव: युक्रेनच्या हवाई हद्दीवर रशियाचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हवाई हल्ला आहे. युक्रेनचे अध्यक्ष

पाकिस्तान : आत्मघातकी स्फोटात १६ सैनिकांचा मृत्यू

उत्तर वझिरिस्तान : पाकिस्तानमधील उत्तर वझिरिस्तानमध्ये स्फोटकांनी भरलेल्या वाहनाने सैनिकांच्या वाहनाला धडक