आठवणीच्या हिंदोळ्यात रंगली स्वरांची दिवाळी पहाट!

Share

किशोर गावडे

मुंबई : दीपावली म्हणजे भारतीय संस्कृतीतला सगळ्यात मोठ्ठा सण. पंचपक्वान्न, फराळ आणि पावसाळ्यानंतर वातावरणात प्राप्त झालेल्या नावीन्याचा सोहळा म्हणजेच दीपावली. दीपावलीचे स्वागत जसे दीप लावून केले जाते. तसेच सुरेल भावगीतांनी वातावरणात रमणीयता प्रदान होत असते. अखिल भांडुप कलाकार कट्टा निर्मित, सुरेल दिवाळी पहाट महाराष्ट्र मंदिर प्रस्तुत, वारसा संस्कृतीचा या मराठी वाद्यवृंदाचा कार्यक्रमाचे आयोजन ज्येष्ठ उद्योजक सतीश अधिकारी व श्री गणपत माळी गृहनिर्माण संस्था यांनी भांडुप पश्चिमच्या समर्थनगरातील महाराष्ट्र मंदिराच्या प्रशस्त आवारात आयोजन केले होते.

यावेळी सुप्रसिद्ध गायक, व पुरोहित प्रसाद पटवर्धन, रश्मी आर्डेकर, राजेश आयरे, प्रसन्ना सावंत, दीपिका दणदणे, नितिकेश पुजारे व प्रमोद राड्ये यांच्या गोड मधुर स्वरांनी सुरेल दिवाळी पहाट संस्मरणीय ठरली.

यावेळी, श्रोत्यांनी पहाटेचा भावमयी स्वरानंदाचा आनंद घेतला. हा कार्यक्रम जेवढा सुरेल ठरला, तेवढाच खुमासदार देखील होता.

या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सुत्रसंचलन सुजय बागवे यांनी करीत जुन्या आठवणींचा पट उलगडत केला. कलावंत सुजय बागवेने गीतरचना, व त्याच्यावरच चढलेला सुरेल संगीतमय साज, याचा इतिहास रसिकांपुढे उलगडला.

सकाळी ७ वाजता सुरू झालेल्या स्वरांनी सजलेल्या ‘’प्रभातकालीन संगीत मैफलीला सुरुवात केली. या ‘दिवाळी पहाट’या कार्यक्रमात भावगीतांच्या या मैफलीत गीत, भावगीत, अभंग, पोवाडा, सादर करत उत्तरोतर मैफल रंगविली. ही सुश्राव्य गाणी सादर करत रसिकांच्या मनाचा वेध घेतला. श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मनमुराद आस्वाद घेतला. तर योगेश जोशी, किबोर्ड, हार्मोनियम, मिलिंद ठाकूर, रुणाल सावंत, ऑक्टो पॅड, ढोलक व तबला गौरव साळवी, पुनीत कांबळी, या वादकांनी संगीताची साजेशी चांगलीच साथ दिली.

तर ओवी केळुस्कर, सतीश हांडे, मधुकर विचारे, महेश तावडे, पूर्णिमा पोळ, यांनी त्यांना अभिनय व नृत्याची अप्रतिम साथ दिली. साऊंड सिस्टिम संदीप मसुरकर पॅडी यांनी दिली होती. सुजय बागवे आदर्शवत छोट्या कलाकाराने निवेदनातून या मैफलीला शाब्दिक अलंकार चढवले. तर प्रसिद्ध निवेदक, गायक संगीतकार व नृत्यदिग्दर्शक किरण खोत यांनी आपल्या पहाडी आवाजात मालवणी भाषेत “येवा मालवण आपलाच आसा’ हे अप्रतिम गायन करीत उपस्थितांची मने जिंकून रसिकांचा उत्साह द्विगुणित केला.

भांडुप मधील कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक, डॉक्टर, व्यावसायिक, व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

यावेळी प्रहारच्या दिवाळी अंकाचे वितरण सतीश अधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

Recent Posts

प्रभासच्या नायिकेवर पाकिस्तानी सैन्याशी संबंध असल्याचा आरोप, पोस्ट शेअर करत म्हणाली- माझा कोणताही संबंध नाही

पहलगाम हल्ल्यानंतर 'फौजी' ची अभिनेत्री इमानवी इस्माईलला विरोध Prabhas Actress Imanvi Esmail: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण…

8 minutes ago

Maharashtra Weather : सूर्य आग ओकणार! ‘या’ जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट जारी

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात उष्णता प्रचंड वाढत (Heat Wave) चालली आहे. एप्रिल महिन्यात…

26 minutes ago

INS सूरतवरुन यशस्वी क्षेपणास्त्र चाचणी

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारतात सुरू असलेल्या राजकीय…

39 minutes ago

भारतात होणारी दक्षिण आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा पुढे ढकलली

कोलकाता : पहलगाममध्ये मंगळवारी(दि.२२) झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जूनमध्ये भारतात होणारी दक्षिण आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा अनिश्चित…

44 minutes ago

Fawad Khan : पहलगाम हल्ल्यानंतर सरकारचा अ‍ॅक्शन मोड! फवाद खानच्या ‘अबीर गुलाल’ चित्रपटावर घातली बंदी

मुंबई : पहलगाम हल्ल्यामुळे (Pahalgam Terror Attack) संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडाली असून संतापाची लाट…

1 hour ago

Pahalgam Terror Attack: खारट फ्राईड राईसने वाचवला ११ जणांचा जीव

जम्मू काश्मीरला फिरायला गेलेल्या एका कुटुंबासाठी खारट फ्राइड राईस जीवदान ठरले मुंबई: पहलगामच्या बैसारण येथे…

2 hours ago