Tuesday, July 23, 2024
Homeताज्या घडामोडीदिवाळीत सिडकोची ७,८४९ घरांची लॉटरी जाहीर

दिवाळीत सिडकोची ७,८४९ घरांची लॉटरी जाहीर

ऑगस्ट २०२२ मध्ये काढलेल्या ४,१५८ घरांच्या नोंदणीसाठीही ३ नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ

नवी मुंबई : आपल्या हक्काचे घर असावे हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक स्वप्न असते. तुमचे हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी ऐन दिवाळीच्या मुहुर्तावर सिडकोने तब्बल ७ हजार ८४९ घरांसाठी लॉटरी जाहीर करत खास भेट दिली आहे. नवी मुंबई शहरात आपल्या हक्काचे घर घेण्याचे स्वप्न तुम्हाला साकारता येणार आहे.

सिडकोने जाहीर केलेली ही घरे नवी मुंबईतील खारकोपर, बामणडोंगरी येथे आहेत. प्रस्तावित नवी मुंबई विमानतळ, ट्रान्सहार्बर रोड या नजीक हा प्रकल्प आहे. घरांच्या लॉटरीसाठी उद्यापासून नोंदणी करता येईल. त्याचसोबत सिडकोने ऑगस्ट २०२२ मध्ये काढलेल्या ४ हजार १५८ घरांच्या नोंदणीसाठीही ३ नोव्हेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

नवी मुंबईतील द्रोणागिरी, कळंबोली, तळोजा, खारघर नोडमध्ये ही घरे आहेत. परवडणाऱ्या दरातील या ४ हजार १५८ घरांपैकी ४०४ घरे ही पंतप्रधान आवास योजनेंतंर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाकरिता आणि ३ हजार ७५४ घरे सर्वसाधारण प्रवर्गाकरिता उपलब्ध आहेत. त्यात २४५ व्यापारी गाळ्यांची लॉटरी काढण्यात आली होती.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -