मुंबई : कोविडच्या प्रादुर्भावानंतर दोन वर्षांनी निर्बंधमुक्त दिवाळी आपण साजरी करीत आहोत. गोरगरिबांसाठी आनंदाने व गोड पदार्थाने साजरी व्हावी यासाठी शासनाने ‘आनंदाचा शिधा’ किटचे वाटप राज्यभर केले आहे. या उपक्रमातून सर्वसामान्यांची दिवाळी आनंदाची व्हावी, अशा सदिच्छा मोफत किट वाटप कार्यक्रमात माजी आमदार व ईशान्य मुंबई विभाग प्रमुख अशोक पाटील यांनी दिल्या.
क्वारी रोड येथे रविवारी सायंकाळी आनंदाचा शिधा किटचे मोफत वाटप करण्यात आले. या किटमध्ये १ किलो मैदा, १ किलो साखर, १ किलो रवा, १ लिटर पामतेलाचा समावेश आहे. ५ हजारांहून अधिक लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा किटचे मोफत वाटप करण्यात आले.
यावेळी ईशान्य मुंबई महिला विधानसभा संघटक राजश्री मांदिवलीकर, भांडुप विधानसभा संघटक नेहा पाटकर, उपविभाग प्रमुख प्रकाश माने, उपविभाग प्रमुख संजय दुडे, शाखाप्रमुख प्रकाश सकपाळ, संजय शिंदे, अमित डिचोलकर तसेच महिला शाखा प्रमुख तेजस्वी बने, समन्वयक ज्योती तांडेल व अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.