Thursday, March 20, 2025
Homeक्रीडाबांगलादेशचा नेदरलँडवर ९ धावांनी रोमहर्षक विजय

बांगलादेशचा नेदरलँडवर ९ धावांनी रोमहर्षक विजय

टी-२० विश्वचषक स्पर्धा

ब्रिस्बेन (वृत्तसंस्था) : तस्कीन अहमद आणि हसन महमूद यांच्या अप्रतिम गोलंदाजीच्या बळावर बांगलादेशने नेदरलँडवर ९ धावांनी विजय मिळवला. या विजयासह बांगलादेशन टी-२० विश्वचषक स्पर्धेची सुरुवात विजयाने केली आहे.

प्रत्युत्तरार्थ १४५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नेदरलँड संघाला पहिल्या दोन चेंडूंमध्ये दोन धक्के बसले. नेदरलँड्सच्या संघाकडून कॉलिन अॅकरमनने एकाकी झुंज दिली. त्याने ४८ चेंडूंत ६२ धावांची खेळी केली. इतर फलंदाजांची त्याला मिळाली नाही. नेदरलँड्सचा संघ २० षटकांत १३५ धावांवर सर्वबाद झाला. हा सामना बांगलादेशने नऊ धावांनी जिंकला. बांगलादेशाकडून तस्कीन अहमदने चार, तर हसन महमूदने दोन विकेट्स घेतल्या. याशिवाय, शाकिब अल हसन आणि सोमया सरकारला प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली.

या सामन्यात नेदरलँड संघाचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधाराचा हा निर्णय अगदी योग्य ठरला. कारण बांगलादेशच्या संघाला २० षटकांत आठ विकेट्स गमावून १४४ धावांपर्यंत मजल मारता आली. बांगलादेशकडून अफिफ हुसेनने सर्वाधिक ३८ धावांची खेळी केली. तर, नजमुल शांतोने २५ धावा केल्या. नेदरलँड्सकडून व्हॅन मेकर्न आणि बेस डिल्डे यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. इतर ४ गोलंदाजांना प्रत्येकी एक- एक विकेट मिळाली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -