Share

साप्ताहिक राशिभविष्य, दि. २३ ते २९ ऑक्टोबर २०२२

आत्मविश्वासपूर्ण राहाल
मेष – सुरुवातीलाच सुख संविधानमध्ये वाढ होणार आहे. शुभ बातम्या मिळतील. बाजारामध्ये मंदी असली तरी आपल्याकडे लोकांचे येणे-जाणे, विक्री वाढण्याची शक्यता आहे. आपला आत्मविश्वास भरपूर असणार आहे. जुनी काही राहिलेली कामं तीसुद्धा पूर्ण होणार आहेत. सप्ताहाच्या मध्यावधीमध्ये थोडेसे मानसिक तणाव राहणार आहेत. या कालावधीमध्ये आपण धैर्याने, सावधतेने पावले टाकली पाहिजेत. सामाजिकदृष्ट्या मानहानीचे प्रसंग येण्याची शक्यता आहे. त्या दृष्टिकोनातून आपण सावध
राहिले पाहिजे.

सामाजिक स्तर उंचावेल
वृषभ – या सप्ताहात ग्रहयोग आपणास अनुकूल असणार आहे. तुम्ही विचार केलेली आणि नियोजित केलेली कामे त्याचप्रमाणे होणार आहेत. भौतिक सुखाबरोबरच ऐश्वर्या संपन्नता वाढणार आहे. आनंदात व मौजमजेत वेळ घालवणार आहात. बराच काळ घरातील वादळं असतील ती संपणार आहेत. आपल्या मुलांकडून काही शुभ समाचार मिळण्याची शक्यता आहे. आपला मान, प्रतिष्ठा, सामाजिक स्तर उंचावणार हा कालावधी असणार आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून आपणास चांगले लाभ मिळणार आहेत. तरी आता परत गुंतवणुकीचा प्रश्न समोर येणार आहे.

उत्साह वाटेल
मिथुन – आपल्या राशीतील शुभ ग्रहांच्या भ्रमणामुळे प्रेमी युगुलांसाठी हा कालावधी आहे. तुम्ही एकमेकांना भरपूर वेळ देऊ शकता, शिवाय हा कालावधी आपल्या घरच्यांना सांगू शकता. आपली एनर्जी लेव्हल उच्चप्रतीची असणार आहे. आपणास एखादी चांगली बातमी समजू शकते किंवा खूप दिवसांपासून अडकलेले पैसे आपणास मिळू शकतात. कुटुंबाच्या दृष्टिकोनातून आताचे वातावरण आपणासाठी सुखदायक असणार आहे. कुटुंबातील व्यक्तींचे एकमेकांना सहाय्य मिळणार आहे. कामाची धावपळ असूनही आपणास उत्साह वाटणार आहे.
भाग्याची दारे उघडतील
कर्क – ज्या व्यक्तींच्या वैवाहिक जीवनामध्ये नीरसता आली होती किंवा कंटाळवाणे जीवन वाटत होते, त्यांना आता आनंद आणि आशा निर्माण होणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये मधुरता येणार आहे. जोडीदाराला आनंदी ठेवण्यासाठी आपण कोणतीही कसर सोडणार नाही. त्यांच्या सांगण्यावरून आपण एखादी महाग भेट वस्तू पण त्यांना तुम्ही देऊ शकता. सरकारी नोकरी करणाऱ्यांना पूर्वीचे काही येणे असेल, ती येणी येतील. सप्ताहाच्या शेवटी प्रवास होण्याची शक्यता आहे. संतती प्राप्तीचे शुभयोग होत आहेत. आपल्यासाठी भाग्याची दारे उघडणार आहेत.
आर्थिकदृष्ट्या प्रगतिपथावर
सिंह – आपल्या राशीतून शुभ ग्रहांचे गोचर भ्रमण आपल्यासाठी आर्थिक बाबतीत खूप चांगले राहणार आहे. आपणास गुंतवणूक करायची असल्यास दीर्घ मुदतीची गुंतवणूक करू शकता. त्यामध्ये बराच फायदा होणार आहे. आपण अर्थप्राप्तीसाठी बरेच प्रयत्न करणार आहात. पण आपणास कमी कष्टात जास्त फायदा होण्याची शक्यता आहे. पार्टनरशिप असेल, तर आर्थिक फायदा होईल. आर्थिकबाबतीत वडिलांकडून प्रत्यक्षात फायदा होण्याची आशा आहे. व्यापार-व्यवसायात आर्थिक प्रगती होईल.
मित्रांचा सहयोग मिळेल
कन्या – व्यापार व्यवसायामध्ये अपेक्षित आर्थिक फायदा होणार नाही. उत्पन्न कमी असल्यामुळे आणि जास्त खर्च असल्यामुळे आपली बचत खर्च होण्याची शक्यता आहे. आपली एखादी महत्त्वाची वस्तू बरेच दिवस सापडत नसल्यामुळे आपण बैचेन असाल, ती वस्तू आपणास आता मिळणार आहे. त्यामुळे आपण नि:श्वास टाकणार आहात. ज्या व्यक्ती नोकरी करत आहेत, त्यांचे नोकरीतील वातावरण सकारात्मक असणार आहे. त्यामुळे आपण आनंदी असणार आहात. आपणास मित्रांचा सहयोग मिळणार आहे.
नाव आणि कीर्ती मिळेल
तूळ – परिवारामध्ये शांतीचे वातावरण असणार आहे. वैवाहिक जीवनामधील गैरसमज दूर होतील. विद्यार्थ्यांना उत्तम यश मिळेल. या यशामुळे आपले स्थान आपण बळकट करणार आहात. आपले खाणे-पिणे आपण वेळेवर करावे, अन्यथा त्याचा परिणाम प्रकृती स्वास्थ्यावर होण्याची शक्यता आहे. उच्च शिक्षणासाठी आपणास स्कॉलरशिप मिळू शकते. आपली मानसिक अस्वस्थता दूर होणार आहे. आर्थिकदृष्टीने आपण समाधानी राहाल. आपणास नाव, कीर्ती मिळणार आहे.
मानसन्मानात वाढ होईल
वृश्चिक – व्यापार व्यावसायिकांना अतिशय चांगला कालावधी आहे. ज्यांचे व्यवसाय हॉटेल रेस्टॉरंट अशा प्रकारचे व्यापार आहेत त्यांना अतिशय उत्तम. परदेशी प्रवासी येतील आणि इतरही व्यक्ती येऊन हॉटेल फूल असणार आहेत. हा व्यवसाय जोरात चालणार आहे. कला क्षेत्रातील व्यक्तींना पण हा कालावधी अतिशय उत्तम असणार आहे. नवीन प्रस्ताव येतील, कामे भरपूर प्रमाणात मिळतील, प्रसिद्धी भरपूर होईल. नोकरी करणाऱ्यांना हा कालावधी चांगला असेल. नोकरीमध्ये चांगली स्थिती असेल. मानसन्मानात वाढ होईल. धनप्राप्ती होईल.
उत्तम कालावधी
धनु – हा चांगला कालावधी आहे. ज्या व्यक्ती सरकारी कामांमध्ये आहेत, त्यांना प्रमोशन मिळू शकते. ज्या व्यक्ती खासगी नोकरी करतात, त्यांना पगार वाढ मिळू शकते. आपल्या कार्यकुशलतेमुळे आपल्या कार्यक्षेत्रात आपल्याला चांगले यश मिळणार आहे. ज्या व्यक्तींचा व्यापार व्यवसाय कपड्यांचा, तयार कपडे, ब्यूटिपार्लर यांच्यासंबंधी आहे, त्यांना आताचा कालावधी चांगला सिद्ध होईल. जबाबदारी वाढेल. पण आपल्यामधील आत्मविश्वास चांगला असल्यामुळे आपण ही कामे सहजरीत्या करू शकता. आपणासाठी हा उत्तम कालावधी आहे.
जोडीदाराचे सहाय्य मिळेल
मकर – भागीदारीमध्ये काही आव्हानात्मक गोष्टींना सामोरे जावे लागणार आहे. वैवाहिक आयुष्यामध्ये जर आपला जोडीदार नोकरी किंवा काही काम करत असेल, तर आपल्यामध्ये काही गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. जोडीदाराबद्दल थोडी सहानुभूती दाखवणे आवश्यक आहे. व्यापार व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असल्यास चांगल्या तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तरच आपल्याला अपेक्षित आर्थिक लाभ मिळतील. आर्थिक स्थिती चांगली होण्यासाठी आपला जोडीदार आपल्याला सहाय्य करणार आहे.
आनंददायक कालावधी
कुंभ – शेअर बाजारांमध्ये आपल्याला फायदा होणार आहे. तसेच जमीन-जुमलामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना आर्थिक लाभ होणार आहे. यात्रा कंपनींना हा कालावधी व्यापारी दृष्टीने चांगला आहे. त्यात विदेशी प्रवास कंपनी यांना अतिशय उत्तम कालावधी आहे. बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर तसेच बिल्डिंग मटेरियल संबंधित व्यावसायिकांना आर्थिक लाभ उत्तम होणार आहे. गुंतवणूक विचारपूर्वक करणे आवश्यक आहे. सप्ताहाच्या मध्यावधीमध्ये नवीन घर खरेदी करण्याची शक्यता आहे. हा कालावधी आपणास आनंददायी ठरेल.
सकारात्मक दृष्टीने पुढे जावे
मीन – आपले वरिष्ठ त्यांचे स्वतःचे काम तुमच्यावर टाकण्याची शक्यता आहे. त्यामुळे कामाचा ताण वाढणार आहे. त्यामुळे आपले मानसिक संतुलन बिघडण्याची शक्यता आहे. आपणास वाटले तरी आपण त्यांना विरोध करू शकणार नाही. त्यामुळे आपल्याला असं वाटेल की, आपली बदली व्हावी. महिलांना सासरी कलह किंवा वादविवादाला सामोरे जावे लागणार आहे. अशावेळी आपण आपला आत्मविश्वास वाढून धीराने समोर गेले पाहिजे. हा कालावधी जास्ती चालणार नाही. त्यामुळे आपणास सकारात्मक दृष्टीने पुढे जावे लागेल, तर आपली प्रगती होणार आहे. विद्यार्थ्यांनी जास्त कष्ट घेतले पाहिजेत.

Recent Posts

KKR vs GT, IPL 2025: गुजरातविरुद्ध घरच्या मैदानावर कोलकत्त्याचा लाजिरवाणा पराभव

कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…

6 hours ago

उबाठाला राणेंचा दणका! सिंधुदुर्गात होणार १५०० कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश!

२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…

7 hours ago

ही कणकवली नव्हे, कुडाळ आहे! निलेश राणे यांच्याशी पंगा नको!

माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…

7 hours ago

नाल्यातून गाळ काढताना ३० सेकंदाचा व्हिडीओ कंत्राट कंपनीला बंधनकारक

लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…

8 hours ago

PM Modi : आजची धोरणं, उद्याचं भारत! – पंतप्रधान मोदींचा नागरी सेवकांना मंत्र

PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…

8 hours ago