Monday, June 30, 2025

सलमान खानला डेंग्यू!

मुंबई : सलमान खानला डेंग्यू झाल्याने बिग बॉस-१६ या शोचे शूटिंग रद्द करण्यात आले आहे. सलमान पुढची काही आठवडे हा शो होस्ट करू शकणार नाही. सलमान पूर्ण बरा होईपर्यंत त्याच्या जागी करण जोहर बिग बॉस १६ चे काही भाग होस्ट करेल. कलर्स टीव्हीने करण जोहरचा टिझरही रिलीज केला आहे.


याआधी शुक्रवारी प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये सलमान खान दिसला नाही. या सीझनचा वीकेंड का वार या भागाची होस्टिंग सलमान खान करतो. तो भाग शुक्रवार आणि शनिवारी प्रसारित केला जातो. मात्र यावेळी शुक्रवारी प्रसारित झालेल्या नव्या एपिसोडमध्ये सर्वजण सलमानची वाट पाहत होते, परंतु तो शोमध्ये आलाच नाही. त्यामुळे अनेक प्रश्नांना उधाण आले होते. त्यावर समोर आलेल्या माहितीनुसार, सलमानची गेल्या काही दिवसांपासून तब्येत खराब झाली होती. आता तपासणी केल्यानंतर त्याला डेंग्यू झाल्याचे निदान झाले आहे. त्यामुळे आता काही दिवस तो हा शो होस्ट करणार नसून आता त्यांच्या जागी करण जोहर हा शो होस्ट करणार असल्याची माहिती समोर आली आहे.


यापूर्वीही करणने बिग बॉसच्या ओटीटीवरील पहिला सीझन होस्ट केला होता. सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार सलमान २५ ऑक्टोबर पासून पुन्हा बिग बॉसच्या चित्रीकरणाला सुरुवात करण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >