रिपाईचे पवनकुमार बोरुडेंची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे लेखी मागणी
मुंबई : शिधापत्रिका धारकांना राज्य शासनाकडून दिवाळी करिता “आनंदाचा शिधा” दिला जाणार आहे, त्यासाठी शंभर रुपये न आकारता तो पूर्णपणे मोफत दिला जावा, अशी लेखी मागणी भांडुप विभागाचे प्रभारी तालुका अध्यक्ष पवनकुमार बोरुडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
राज्यातील १ कोटी ७० लाख कुटुंबांना म्हणजेच ७ कोटी लोकांना “आनंदाचा शिधा” ही शिधा वस्तूंची दिवाळी भेट मिळणार आहे. परंतु त्यासाठी या नागरिकांना १०० रुपये मोजावे लागणार आहेत. ते न मोजता त्यांना हा “आनंदाचा शिधा” मोफत देऊन त्यांची दिवाळी आणखी गोड करावी, अशी मागणी पवनकुमार बोरुडे यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना केली आहे.