सिडको घनकचरा प्रकल्पाच्या दूषित सांडपाण्यामुळे नदी आणि शेती झाली दूषित

नवीन पनवेल : तळोजा घोट येथील सिडको घनकचरा प्रकल्पाच्या दूषित सांडपाण्यामुळे घोट नदी आणि आजूबाजूची शेती दूषित झाली आहे. याप्रकरणी गावदेवी सामाजिक संस्था, घोट यांनी महाराष्ट्र प्रदूषण मंडळ यांच्याकडे तक्रार केली आहे. मात्र तक्रार करून देखील याकडे कानाडोळा करण्यात येत असल्याचा आरोप गावदेवी सामाजिक संस्थेने केला आहे.


तळोजा स्थित सिडको घनकचरा प्रकल्प आणि कचरा विलगीकरण प्रकल्पामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. सिडको घनकचरा प्रकल्पाचे दूषित पाणी कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करता थेट प्रकल्प बाहेर असलेल्या शेतीमध्ये आणि नदीमध्ये सोडण्यात येत असल्याचा आरोप या संस्थेने केला आहे.


दूषित पाण्यामुळे घोट नदी आणि आजूबाजूला असलेली शेती मोठ्या प्रमाणात दूषित झाली आहे. नुकतेच घोट नदी आणि जवळ असलेल्या शेततळ्यातील मासे या प्रकल्पाच्या दूषित पाण्यामुळे मरण पावले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दुर्गंधी पसरली होती. घोट नदीच्या पात्रातून दूषित पाणी पेंधर आणि तळोजा फेस टू मधील नवीन वसाहतीच्या बाजूने वाहते. त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. याची तक्रार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, बेलापूर येथे देण्यात आली, मात्र त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. तक्रार करून देखील प्रदूषण मंडळ कारवाई करण्याकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहे.

Comments
Add Comment

अनधिकृत ‘एलईडी’ मासेमारी करणाऱ्यांना मत्स्यव्यवसाय विभागाचा दणका

मंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार गस्ती मोहीम; तीन नौकांवर कठोर कारवाई मुंबई : महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत

जिल्ह्यासाठी २८८ कोटींचा विकासनिधी

आराखड्यापैकी ६० टक्के निधी मिळाला, ५० टक्क्यांचे वितरण अलिबाग : राज्य सरकारने नुकतीच दोन वर्षे पूर्ण केली. मात्र

ब्रेक फेल झाल्यामुळे एक्सप्रेस वेवर अपघात, ट्रकचा झाला चेंदामेदा

रायगड : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बुधवारी मोठा अपघात झाला. सिमेंट ब्लॉक घेऊन जात असलेला ट्रक थेट रस्त्याच्या

माकडांसह भटक्या कुत्र्यांचा उपद्रव

पोलादपूरमध्ये वर्षभरात २७४ श्वानदंश रुग्ण शैलेश पालकर पोलादपूर : भटकी कुत्री, गुरे आणि माकडांच्या तसेच अन्य

वीज कंत्राटी कामगारांना १३ वर्षांनी न्याय

आंदोलनांना यश, २,२८५ कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरी अलिबाग : वीज मंडळातील कंत्राटी कामगारांच्या दीर्घ

रायगडमधील ईव्हीएम स्ट्राँग रूम उंदरांनी फोडली?

कपाटाचे दरवाजे उघडल्याने एकच खळबळ अलिबाग : येत्या २१ डिसेंबरला नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकांची मतमोजणी पार