भोपाळ (वृत्तसंस्था) : मध्यप्रदेशातील रीवा जिल्ह्यात मध्यरात्री बस आणि ट्रक यांचा भीषण अपघात झाला असून या अपघातात दिवाळीसाठी घराकडे निघालेल्या १४ प्रवाशांचा मृत्यू झाला. तर ४० हून जास्त प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस, स्थानिक नागरिक मदतीसाठी दाखल झाले आहेत.
याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेशला जोडणाऱ्या नॅशनल हायवे ३० वर हा भीषण अपघात झाला आहे. अपघात झालेली बस हैदराबादहून गोरखपूरला जात होती. रात्री ११.३० च्या सुमारास रिवाजवळ हा अपघात झाला आहे. बसमधील सर्व प्रवासी कामगार होते. दिवाळी साजरी करण्यासाठी ते आपल्या घरी जात होते. घटनास्थळी स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य मोठ्या वेगाने सुरू आहे. बसमध्ये १०० हून अधिक प्रवासी प्रवास करत होते. ज्यात उत्तर प्रदेश आणि बिहारमधील प्रवाशांचा समावेश होता. ही बस हैदराबादहून लखनऊकडे जात होती. या दुर्घटनेबाबत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दु:ख व्यक्त केले आहे.
मध्यप्रदेशच्या दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र यांनी दु:ख व्यक्त केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या ट्विटमध्ये म्हणाले, ‘अपघातमध्ये ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याबद्दल माझ्या मनापासून संवेदना. मी सर्व जखमींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थन करतो’. हा अपघात नेमका कसा आणि कशामुळे झाला याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर येऊ शकलेली नाहीये. तसेच गाडीत नेमके किती प्रवासी होते, ते कुठले निवासी होते त्यांची नावे या संदर्भात अद्याप कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.