Friday, June 13, 2025

युवराज सिंग दृष्टिहीनांच्या विश्व क्रिकेट कपचा ब्रँड अम्बॅसेडर

युवराज सिंग दृष्टिहीनांच्या विश्व क्रिकेट कपचा ब्रँड अम्बॅसेडर

मुंबई (वार्ताहर) : क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड इन इंडियाने शुक्रवारी दिग्गज क्रिकेटपटू युवराज सिंगची भारतात होणाऱ्या दृष्टिहीनांसाठीच्या तिसऱ्या टी-२० विश्वचषकासाठी ब्रँड अम्बॅसेडर म्हणून घोषणा केली.


तिसऱ्या टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची यादी जाहीर करण्यात आली. ज्यामध्ये अजय कुमार रेड्डी बी२ (आंध्र प्रदेश) कर्णधार म्हणून संघाचे नेतृत्व करेल. वेंकटेश्वर राव दुन्ना - बी२ (आंध्र प्रदेश) उपकर्णधार असेल. विश्वचषकाचे सामने ६ डिसेंबर ते १७ डिसेंबर २०२२ या कालावधीत खेळवले जातील.


दृष्टिहीनांच्या तिसऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये भारत, नेपाळ, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आणि श्रीलंका या देशांचा समावेश आहे. गतविजेते भारत आणि नेपाळ यांच्यात ६ डिसेंबर २०२२ रोजी फरीदाबाद येथे उद्घाटन सामना खेळवला जाईल.


युवराज सिंग म्हणाला की, “मला ब्रँड अम्बॅसेडर म्हणून दृष्टिहीनांच्या तिसऱ्या टी-२० विश्वचषक क्रिकेटचा एक भाग बनून आनंद झाला आहे. मी क्रिकेटची आवड आणि दृष्टिहीन क्रिकेटपटूंच्या दैनंदिन आव्हानांशी लढण्याच्या निर्धाराची प्रशंसा करतो. हे एक वेगळे जग आहे, पण हे क्रिकेटचे जग आहे आणि क्रिकेटला सीमा नसतात. माझा असा विश्वास आहे की या खेळाने मला कसे लढायचे, कसे पडायचे, पुन्हा कसे उठायचे आणि स्वत: वर कसे यायचे हे शिकवले.

Comments
Add Comment