नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत-यूके मुक्त व्यापार करार योग्य दिशेने जात आहे. यूकेमध्ये पुढे काय होते ते पाहावे लागेल. नेतृत्वात झटपट बदल होईल की संपूर्ण प्रक्रिया पुढे जाईल. ब्रिटनमध्ये सुरू असलेल्या राजकीय घडामोडी पाहता, आम्हाला प्रतीक्षा करावी लागेल आणि या पदावर कोण येईल हे पाहावे लागेल त्यानंतरच आम्ही मुक्त व्यापार कराराच्या दिशेने पाऊल टाकू, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी केले आहे.
ब्रिटनचे पंतप्रधान लिझ ट्रस यांनी २०ऑक्टोबर रोजी राजीनामा दिला आहे. भारत-यूके मुक्त व्यापार करार त्यांच्या ४५ दिवसांच्या कार्यकाळात करता आलेला नाही. यावर भारताचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी प्रतिक्रिया दिली. हा करार मार्गावर असून ब्रिटनमध्ये होत असलेल्या राजकीय बदल संपण्याच्या प्रतिक्षेत आहे, असे ते म्हणाले.
ट्रसने दिवाळीपर्यंत भारतासोबत मुक्त व्यापार करार करणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्या म्हणाल्या होत्या की, मी या करारात जीवन विज्ञान, तंत्रज्ञान आणि कृषी क्षेत्राचा समावेश करण्याचा प्रयत्न करेन. भारतासोबतचे संरक्षण आणि व्यापार संबंध अधिक दृढ करण्याबाबतही त्यांनी चर्चा केली.