Tuesday, June 24, 2025

मुलुंडमध्ये शोभेच्या झाडांची रांगोळी

मुलुंडमध्ये शोभेच्या झाडांची रांगोळी

मुंबई (वार्ताहर) : दिवळीनिमित्त मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने चक्क झाडांच्या रांगोळीचा वेगळा प्रयोग केला आहे. मुलुंड येथील स्वामी समर्थ मनोरंजन उद्यानात शोभेकरिता झाडापासून रांगोळी साकारण्यात आली आहे.


दरम्यान, मुलुंड टोल नाक्याजवळ पालिकेचे स्वामी समर्थ मनोरंजन उद्यान आहे. हे उद्यान काही दिवसांपूर्वी सुशोभित करण्यात आले आहे, उद्यानात जॉगिंग ट्रॅक व विविध प्रकारची झाडे, फूल झाडे लावण्यात आली आहेत. यात अल्टरनेंथरा, ड्यूरांटा, जट्रोफा, अलमेंडा, अकेलिफा, कर्दळ, शंकासूर, सिंगोनियम, बांबू, तामण, पाम, लिली अशा १२ ते १५ प्रकारच्या विविध झाडांचा समावेश आहे. याच सोबत शोभेच्या झाडांपासून येथे आकर्षक रांगोळी साकारण्यात आली आहे.


स्वामी समर्थ मनोरंजन उद्यान मुंबई महापालिकेच्या अखत्यारित असून हे उद्यान ६४८२ स्क्वेअर मीटरचे आहे. मुलुंड पूर्वेला टोल नाक्याजवळ हे मनोरंजन उद्यान आहे. उद्यानात १२ ते १५ प्रकारची विविध झाडे, बसण्याची व्यवस्था आणि चालण्यासाठी ट्रॅक बनविण्यात आला आहे. मात्र आता दिवाळीत आकर्षण म्हणून फूल आणि झाडांची रांगोळी बनवली असून अनके जण ते पाहायला गर्दी देखील करत आहेत. पावसाळ्यानंतर लँड स्केप डिजाईन करून सुमारे ३०० उद्यानात अशी संकल्पना राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Comments
Add Comment