नाशिक (प्रतिनिधी) : श्रीनगर येथे पार पडलेल्या सहाव्या एशियन पिंच्याक सिलॅट स्पर्धेत भारतातील ५७ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत १७ देशांतील २८६ खेळाडूंनी सहभाग नोंदविला. यामध्ये महाराष्ट्रातील १४ खेळाडूंनी पदकांची कमाई करत महाराष्ट्राचे नाव सातासमुद्रापार पोहोचविल्याची माहिती पिंच्याक सिलॅट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष किशोर येवले यांनी दिली.
महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आर्टिस्टिक प्रकारात पदके मिळवली आहेत. कृष्णा नरसिंग पांचाळ, गांडा प्रकारात सोमनाथ सोनवणे, सचिन गर्जे यांनी कांस्य पदक, रेगू प्रकारात (मुले) अंशुल कांबळे, वैभव काळे, ओमकार अभंग यांनी रौप्य, मुलींमध्ये प्राजक्ता जाधव, रिया चव्हाण, जयश्री शेटे यांनी कांस्य पदक जिंकले. स्टॅडिंगफाईट प्रकारात अक्षय कळसेकर, रामचंद्र बदक, सोमनाथ सोनवणे, अनुज सरनाईक, आकाश जाधव यांनीही कांस्य पदकांची कमाई केली. या सर्व खेळाडूंना पिंच्याक सिलॅट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष यांचे मार्गदर्शन लाभले.
श्रीनगर येथे नुकत्याच पार पडलेल्या सहाव्या एशियन पिंच्याक सिलॅट स्पर्धेत महाराष्ट्रातील १४ खेळाडूंनी सहभाग घेतला. या स्पर्धेचे उद्घाटन लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा, जम्मू काश्मीरचे विभागीय आयुक्त पी.के.पाल, युवा सेवा आणि क्रिडा विभागाचे आयुक्त सरमद हमीज, पोलीस उपायुक्त विजय कुमार, क्रिडा परिषदेचे सचिव नुजहत गुल, इंडिया पिंच्याक सिलॅट फेडरेशन राष्ट्रीय अध्यक्ष किशोर येवले, सचिव मुक्ती हमीद यासीन, व्यवस्थापकीय संचालक मोहम्मद इकबाल, इंटरनॅशनल पिंच्याक सिलॅट फेडरेशनचे सचिव टेडी सुरतमदजी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.